नवीदिल्ली/दि.३० – प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात कोरोनामुळे अनेक बदल करण्यात आला आहे. लाल किल्ल्यापर्यंत परेड होणार नाही. केवळ 25 हजार लोकांनाच या संचालनाला उपस्थित राहता येईल.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे यंदा प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात अनेक बदल केले गेले आहेत. आपल्या इतिहासात प्रथमच प्रजासत्ताक दिनाची परेड लाल किल्ल्यावर जाणार नाही. संचालनात भाग घेणा-या लोकांची संख्याही कमी केली आहे. या वेळी मुलांना संचलनात भाग घेण्याची परवानगी नाही. तसेच, या प्रत्येक पथकात कमी लोक सहभागी होतील आणि पथकेही लहान असतील. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर, प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सामाजिक अंतराचे भान ठेवले जाईल. सर्व कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण केले जाईल. या वेळी संचलन विजय चौक ते राष्ट्रीय स्टेडियमपर्यंत सुरू होईल. पूर्वी संचलनाची लांबी 8.2 किलोमीटर असायची; परंतु या वेळी विजय चौक ते राष्ट्रीय स्टेडियमपर्यंतच्या संचलनाची लांबी 3.3 किलोमीटर असेल.
प्रजासत्ताक दिन परेड पाहण्यासाठी दरवर्षी एक लाख 15 हजार लोक उपस्थित असत. या वेळी फक्त 25 हजार लोक या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दरवर्षी 32 हजार तिकिटे विकली जात होती; परंतु या वर्षी त्याची संख्याही 7500 करण्यात आली आहे. या वेळी उभे राहून परेड पाहता येणार नाही. जास्तीत जास्त जागांना बसून संचलन पाहता येईल. या वेळी लहान मुले प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भाग घेणार नाहीत. केवळ 15 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांना समाविष्ट केले जाईल. तसेच, अपंग मुले या वेळी सामील होणार नाहीत. कोविड बूथ बनविले जातील. संचलनात भाग घेणारे तसेच उपस्थित प्रत्येकाला मुखपट्टी घालावी लागेल. प्रवेश आणि निर्गमन गेटची संख्याही वाढविली जाईल. कोविड बूथही बांधले जातील. त्यात डॉक्टर आणि पॅरा मेडिकल स्टाफ उपस्थित असेल. प्रत्येक गेटवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था केली जाणार आहे. तीनशेहून अधिक ठिकाणी हँड सॅनिटायझर्स ठेवण्यात येतील. १५ जानेवारी रोजी सैन्य दिन संचलनानंतर प्रजासत्ताक दिन संचलनाच्या तालमी होईल.