अमरावती चादुंरबाजार – मध्य प्रदेशात चांगला पाऊस पडत असल्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चांदुर बाजार तालुक्यातील घाटलाडकी येथील २८४ हेक्टर क्षेत्रफळात पसरलेल्या ९.८७ द. ल. घ. मी, पाणी साठा असलेले चारगड धरण हे पूर्ण क्षमतेने भरून ते आता ओव्हरफ्लो झाले आहे.
धरणाच्या भिंतीवरून चार सेंटिमीटर पाण्याचा विसर्ग होत असुन परसोडा, बेलमंडी, घाटलाडकी, वरोळी यांसारख्या नदीकाठी वसलेल्या गांवाना चारगड धरण प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आले आहे.
या धरणावर १४०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असल्याने
याचा धरणाच्या परिसरातील व कालव्याद्वारे ओलिताखाली येणाऱ्या शेतातील शेतक-यांना याचा मोठा फायदा होणार आहे..