मराठी

पुलवामा प्रकरणात आरोपपत्र दाखल

पाकिस्तानी अतिरेक्यांचे फोटो प्रसिद्ध; ‘जैश‘वर ठपका

जम्मू : गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामायेथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ला (Terrorist attack on Central Reserve Police Force convoy at Pulwama in Kashmir) प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने मंगळवारी १३ हजार ५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पुलवामा आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव दलाचे ४० जवान हुतात्मा झाले. ‘जैश-ए-मोहम्मद‘ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. ‘एनआयए‘ने आरोपपत्रात ‘जैश‘चा प्रमुख मसूद अजहर आणि अब्दुल रऊफसह एकूण १३ दहशतवाद्यांना आरोपी बनवले आहे. जम्मू येथे असलेल्या ‘एनआयए‘च्या विशेष न्यायालयात पोहोचलेल्या ‘एनआयए‘च्या पथकाने १३ हजार पाचशे पानी आरोपपत्र दाखल केले आहे. ‘एनआयए‘ने पुलवामा हल्ल्यातील आत्मघातकी हल्लेखोराच्या अनेक साथीदारांना अटक केली. त्यांनी पाकिस्तानातील आपल्या म्होरक्यांच्या इशाऱ्यावर हल्ला करणाèया दहशतवादी आदिल अहमद डार याला मदत केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात वापरण्यात आलेले आरडीएक्स पाकिस्तानहून काश्मीर खोèयात आणले होते, असे ‘एनआयए‘ने आरोपपत्रात म्हटले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने आरोपपत्रात ‘जैश-ए-मोहम्मद‘चा प्रमुख मसूद अजहर आणि त्याचा भाऊ अब्दुल रऊफ असगर याला आरोपी बनवले आहे. या व्यतिरिक्त आरोपपत्रात ठार करण्यात आलेले दहशतवादी मोहम्मद उमर फारूख, आत्मघातकी हल्लेखार आदिल अहमद डार आणि पाकिस्तानातून सक्रिय असलेले इतर दहशतवादी कमांडरची नावेदेखील नमूद करण्यात आली आहेत. योग्य पुराव्यांसह या आरोपपत्रात आरोपींची नावे टाकण्यात आल्याचे ‘एनआयए‘च्या एका अधिकाèयाने माहिती देताना सांगितले. यामध्ये त्यांची चर्चा, कॉलाचा तपशील इत्यादींचा समावेश आहे. याद्वारे या सर्वांचा हल्ल्यात सहभागअसल्याचे स्पष्ट होत असल्याचे अधिका-याने सांगितले. .

Related Articles

Back to top button