मराठी
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज
मध्य प्रदेश :- मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान कोरोनामुक्त झाले आहेत. चौहान यांच्या तिसरा कोरोना तपासणी अहवाल नकारात्मक आला. त्यांना भोपाळच्या चिरायूबरुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे; मात्र त्यांना डॉक्टरांनी पुढील खबरदारी म्हणून सात दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. २५ जुलैला शिवराज सिंह कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर त्यांना भोपाळच्या चिरायू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर दहा दिवसांपासून उपचार सुरू होते.