मराठी

कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही मुख्यमंत्री ठाकरे यांचा निर्धार

पंतप्रधानांशी चर्चा

मुंबई दि. ११ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित आढळलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या वेळी त्यांनी कोरोनावर मात करण्यासाठी मार्गदर्शन केले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही. त्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान कोरोनाच्या महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत माहिती दिली. कोरोनाबाधित आणि मृत्यू झालेली एकही केस लपवली नाही. पारदर्शकपणे माहिती देण्यात आली आहे. कोरोनाबाबत अनेकांच्या मनात भीती तर अनेकांमध्ये काहीही होत नाही अशी भावना आहे; परंतु पोटासाठी बाहेर पडण्याची गरजदेखील आहे. अशा तीन अवस्थेत कोरोनाचा सामना सुरू आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे; मात्र अजूनही लढाई संपली नाही. याकाळात शिवभोजन योजनेच्या माध्यमातून महिन्याला लाखो लोकांना केवळ पाच रुपयांमध्ये जेवणाची सोय केली. राज्यातील गरीब जनतेला याचा मोठा लाभ झाला आहे. मागच्या आठवड्यात कुपोषण निर्मुलनासाठी आदिवासी बालकांना व मातांना दुध भूकटी मोफत देण्याचा निर्णयदेखील राज्य शासनाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोरोनातून बरे होऊन घरी जाणारया लोकांना इतर आजार झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर कोरोनानंतरही उपचार व्हावे, यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात साथ रोग नियंत्रण रुग्णालय मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू करणार असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली. विविध प्रकारच्या विषांणूचा उद्भव कसा आणि का होतो, यावर संशोधन करण्याची गरज असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. राज्यात करोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख बेडस् उपलब्ध असल्याचे सांगतानाच या सुविधांसाठी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी यांची गरज असल्याचेही पंतप्रधानांना सांगितले.

तर कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगण आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सहभाग होता. देशात सध्या सहा लाखांपेक्षा अधिक अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी सर्वाधिक या दहा राज्यांमध्ये आहेत. यासाठी आम्ही आज समीक्षा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या चर्चेतील एकमेकांच्या अनुभवातून खूप काही शिकण्यास मिळाले. या दहा राज्यांना करोनावर मात करण्यास यश मिळालं तर आपला देशही ही लढाई जिंकू शकेल, असे मोदी या वेळी म्हणाले.

Related Articles

Back to top button