मराठी

गलवान खो-यात सैनिक दगावल्याची चीनची कबुली

राजनाथ सिंह यांनी चीनला कठोर संदेश

नवी दिल्ली/दि. १८ – चीनने प्रथमच कबूल केले, की भारतीय सैनिकांसोबत गलवान खो-यात झालेल्या हिंसाचारात आपले सैनिक मारले गेले; परंतु चीनने किती सैनिक मारले गेले, याची माहिती दिली नाही. चिनी सरकारच्या मालकीचे -ग्लोबल टाईम्स’चे संपादक हू शिजिन हे सैनिकांच्या मृत्यूवर मौन बाळगून आहेत. भारतीय संसदेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गलवान खो-यातील संघर्षात आमच्या सैनिकांनी बलिदान दिले. तथापि, त्या संघर्षात चिनी बाजूचेही मोठे नुकसान झाले, असे म्हटले होते.
15 जून रोजी गलवान खो-यांत झालेल्या संघर्षात भारताच्या वीस जवानांना वीरमरण आले. या संघर्षात चीनचे किमान ३५ सैनिक ठार झाल्याचे अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी म्हटले होते; परंतु हु शिजीन यांनी मात्र भारतीय सैनिकांपेक्षा चिनी सैनिकांचे मृत्यू कमी आहेत, असे सांगितले. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराने अनेक भारतीय सैनिकांना पकडले. भारतीय सैन्याने त्यांच्यावर कोणताही इशारा न करता हल्ला केला आणि त्यानंतर हाणामारी झाली, असे अकलेचे तारे त्यांनी तोडले आहेत. १५ जूनच्या घटनेनंतर भारताने मारल्या गेलेल्या सैनिकांची संख्या जाहीर केली; परंतु चीनने आजपर्यंत आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांविषयी कोणतीही माहिती दिली नाही. ९४ दिवसांनी सैनिक मारले गेले, याची कबुली तर दिली आहे. अमेरिकन इंटेलिजेंसच्या अहवालानुसार या चकमकीत 40 चिनी सैनिकही मारले गेले. अलीकडेच त्या सैनिकांच्या अंत्यसंस्काराचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना चीनला कठोर संदेश दिला, तेव्हा चीनने याची कबुली दिली आहे. राज्यसभेत ते म्हणाले, की जगातील कोणतीही शक्ती भारतीय जवानांना लडाख सीमेवर गस्त घालण्यापासून रोखू शकत नाही. चीनने सीमेवर सैन्य तैनात केले आहेत, त्यांचा३ प्रतिकार करण्यासाठी भारताने सैन्य तैनात केले आहे.

Related Articles

Back to top button