मराठी

चीनने डागली दोन क्षेपणास्त्रे

अमेरिकेला धडकी भरविण्याचा प्रयत्न

बीजिंग/दि.२७ – चीनने वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात क्षेपणास्त्रे डागून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने ‘कॅरियर किलर‘ नावाची दोन प्रसिद्ध क्षेपणास्त्रे दक्षिण चीन समुद्रात डागली आहेत. ही क्षेपणास्त्रे डागण्यामागे अमेरिकेला घाबरविणे आणि इशारा देणे आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट‘(South China Morning Post)च्या वृत्तानुसार बुधवारी डीएफ -२६ बी आणि डीएफऋ-२१ डी ही दोन घातक क्षेपणास्त्रे हैनान आणि पारसेल बेटादरम्यान डागण्यात आली. ही क्षेपणास्त्रे मध्यम पल्ल्याची जरी असली, तरी ती अचूक निशाणा लावण्यात तरबेज आहेत. ही बॅलेस्टिक मिसाईल(Balistick Missile) डागल्यामुळे या भागातील हवाई वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी अमेरिकेची युद्धनौका रोनाल्ड रीगनने पारसेल बेटाजवळ युद्धाभ्यास केला होता. त्यालाच उत्तर देण्यासाठी चीनने ही मिसाईल डागल्याचे मानले जात आहे. अमेरिकेच्या यू २ या टेहळणी विमानांच्या घुसखेरीमुळेही चीन नाराज आहे. डीएफ-२१ डी मिसाईलला कॅरिअर किलर म्हटले जाते.
जर हे मिसाईल कोणत्याही युद्धनौकेवर डागल्यास ती युद्धनौका पूर्णपणे उद्ध्वस्त होते. डीएफ-२६ बी या मिसाईलला क़्वींघाई प्रांतातून डागण्यात आले होते, तर डीएफ-२१ डी मिसाईल शांघायच्या दक्षिणेकडील झेजियांग प्रांतातून डागण्यात आले होते. ही कारवाई एक सरावाचा भाग होती. प्रवक्ते वू कीन यांनी सांगितले, की अमेरिकेच्या टेहळणी विमानांनी चीनला डिवचले आहे. त्यामुळे ही क्षेपणास्त्रे डागण्यात आली. अमेरिका असेच युद्धाभ्यास आणि लढाऊ विमानांची उड्डाणे सुरू ठेवणार असेल तर चीनही त्याचे प्रत्यूत्तर देईल. दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेल्या युद्धाभ्यासावेळी अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला होता. यावर चीनने आपल्या सैनिकांना नरमाईचे आदेश दिले असून अमेरिकी सैऩ्यावर कोणत्याही परिस्थितीत पहिली गोळी चालवू नका, असे निर्देश दिले आहेत. अमेरिकेचे आरोग्य मंत्री चार दशकांनंतर तैवानच्या दौरयावर असताना चीनचे हे आदेश आले आहेत. दक्षिण समुद्रातील वादग्रस्त भागात सध्या चीन आणि अमेरिका दोन्ही देश सैन्याची ताकद वाढवू लागले आहेत.

संयम पाळण्याचे चीनचे आव्हान 

या वादग्रस्त क्षेत्रात आता अमेरिकेवर सारखा दबाव वाढवत असून अशात दोन्ही अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्ध होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे चीन वाढता तणाव कमी करू इच्छित आहे. कारण सध्या अमेरिकेत निवडणुकीचे वारे असून कट्टरवादी गट या तणावाचा फायदा घेण्याची भीती चीनला वाटू लागली आहे. असे झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध भविष्यात बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे चीनने त्यांच्या लढाऊ विमानांच्या पा़यलटांना आणि नौसेनेला अमेरिकेच्या युद्धनौका आणि लढाऊ विमानांच्या दळणवळणाला प्रतिकार न करण्यासाठी संयम बाळगण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

Back to top button