चीनमुळे तेलाच्या किमतीत घट
नवीदिल्ली/दि.२० – सोमवारी तेलाच्या किमतीत घट दिसून आली. तिस-या तिमाहीत चीनची आर्थिक वाढ अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याच्या वृत्तानंतर ही घसरण झाली आहे. जगातील सर्वांत मोठा तेल आयातकर्ता अससेल्या चीनच्या आर्थिक संकटामुळे तेलाच्या मागणीवर परिणाम होण्याची भीती आहे. जगातील दुस-या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार एका वर्षांच्या तुलनेत तिस-या तिमाहीत ४.९ टक्के झाला. विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा हे प्रमाण कमी आहे. सरकारी आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. जगातील दुस-या क्रमांकांचा तेल वापरणा-या चीनच्या रिफायनर कंपन्यांनी सप्टेंबरमध्ये त्यांचे प्रक्रिया दर कमी केले. सोमवारी सकाळी चीनच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाल्याच्या वृत्तानंतर ब्रेंट तेलाने ०.४ टक्क्यांनी किंवा १५ सेंटने घसरून ४२.७८ डॉलर प्रति बॅरलवर घसरण दर्शविली. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यातील यूएस डब्ल्यूटीआय कच्च्या तेलाचा दर १८ सेंटांनी घसरून ४०.७० डॉलर प्रति बॅरल झाला.