देप्सांगमधूनही चीन माघार घेणार
नवी दिल्ली/दि. २२ – भारत आणि चीनमध्ये10 व्या फेरीतील लष्करी पातळीवरची चर्चाशनिवारी रात्री दोन वाजेपर्यंत म्हणजेच 16 तास चालली. ही बैठक चीनच्या मॉल्डोपरिसरात झाली. यामध्येपूर्वलडाखच्या हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देप्सांगवरुन सैन्य मागेहटवण्यावर चर्चाझाली. मिळालेल्या वृत्तानुसार चर्चेमध्येभारतानेआपलेमत मांडत म्हटलेआहेकी, या तीन क्षेत्रांमध्येही माघारीची प्रक्रिया जलद व्हावी, सीमेवर तणाव कमी करण्यात यावा.
11 फेब्रुवारीला संसदेत राजनाथ सिंह यांनी लडाखमधून सैन्य माघारीची माहिती दिली होती. राजनाथ यांनी लडाखमध्येभारत आणि चीनचेसैन्य मागेहटल्याची माहिती दिली होती. या करारामुळेभारतानेकाहीच गमावले नाही असा दावाही त्यांनी केला होता आणि तेम्हणालेकी, आम्ही कोणत्याही देशाला एक इंच जमीनही घेण्यास परवानगी देणार नाही. भारत आणि चीननेलष्करी डिसएंगेजमेंट करण्यास सहमती दर्शवली आहे. दोन्ही देश फॉरवर्डडिप्लॉयमेंट हटवतील. म्हणजेच दोन्ही देशांच्या ज्या तुकड्या आतापर्यंत एकमेकांच्या खूप जवळ तैनात होत्या, त्या मागेहटतील. चीन आपल्या तुकड्यांना पँगॉन्ग सरोवराच्या नॉर्थबँकमध्येफिंगर-8 च्या पूर्वेकडे ठेवेल. भारत आपल्या तुकड्यांना फिंगर-3 जवळ परमानेंट थनसिंह थापा पोस्टवर ठेवेल. पँगॉन्ग लेकपासून डिसएंगेजमेंटच्या 48 तासांच्या आत सीनियर कमांडर लेव्हलची चर्चाहोईल आणि उर्वरित मुद्द्यावर तोडगा काढला जाईल. सरोवराच्या नॉर्थ बँकप्रमाणेसाउथ बँकमध्येही डिसएंगेजमेंट होईल.
एप्रिल 2020 पासून दोन्ही देशांनी पँगॉन्ग लेकच्या नॉर्थ आणि साउथ बँकवर जे बांधकाम केले, ते हटवण्यात येईल आणि पहिली अवस्था कायम ठेवण्यात येईल. दोन्ही देश नॉर्थ बँकवर पेट्रोलिंग सध्या थांबवतील. वाटाघाटी करून एखादा करार झाल्यावरच पेट्रोलिंगसारख्या सैन्य कारवाया सुरू होतील.