मराठी

नियंत्रण रेषा बदलण्याचा उधळला डाव

चीनची घुसखोरी त्याच्यावरच उलटविण्याची व्यूहरचना

नवीदिल्ली/दि. ३ – चुशूल सेक्टरमध्ये ड्रॅगनचा एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा डाव भारताने उधळून लावला. त्यानंतर सलग तिसरयादिवशी दोन्ही देशांच्या ब्रिगेड कमांडर्समध्ये तोडगा काढण्यासाठी बैठक झाली. पँगाँग सरोवरच्या दक्षिण किनारयावरील आणि रेझांगला जवळच्या रेचीनला येथील महत्त्वाच्या टेकडया भारताने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. पँगाँगच्या उत्तर किनाèयावरील फिंगर ३ मध्ये भारतीय सैन्य तुकडया आपली स्थिती बळकट करत आहेत. फिंगर ४ च्या पश्चिमेकडील उंचावरील प्रदेश ताब्यात घेतला आहे. फिंगर ८ पासून चिनी सैन्य आठ किलोमीटर आतपर्यंत आले व रिजलाइनवर त्यांचा ताबा आहे. भारताने उचललेल्या या पावलांचा सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरील चर्चेत फायदा होईल, असे सूत्रांनी सांगितले. मोक्याच्या उंचावरील टेकडयांवर ताबा मिळवताना चिनी सैन्याने पूर्णपणे माघारी फिरावे आणि परिस्थिती ‘जैसे थे‘ व्हावी हाच भारताचा रणनीतीक उद्देश आहे.
जुलैपासून दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चर्चेच्या फेरया सुरू आहेत; पण त्यातून आतापर्यंत काहीही निष्पन्न झालेले नाही. उलट तणाव आणखी वाढत चालला आहे. पँगाँग टीएसओचा उत्तर किनारा आणि गोग्रा पोस्ट येथे चिनी सैन्य अजूनही तळ ठोकून आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने एकतर्फी नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैन्याने जलदगतीने हालचाल करत दक्षिण किनाèयावरच्या टेकडया ताब्यात घेतल्या. जेणेकरून चीनला वरचढ होण्याची संधी मिळू नये, असे एका सैन्य अधिकाèयाने सांगितले. उत्तर किनारयावरही भारतीय सैन्याने पोझिशन्समध्ये काही बदल केले आहेत असे हा अधिकारी म्हणाला. दरम्यान, चीनने नेपाळला भारताविरोधात चिथावले असून लिपुलेखमधील भारताच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे आदेश नेपाळच्या सशस्त्र दलाला ओली सरकारने दिले आहेत. उत्तराखंडमधील लिपुलेख भारत, नेपाळ आणि चीनच्या सीमांना जोडतो. नेपाळच्या गृहमंत्रालयाने एक आदेश जारी करत नेपाळ सशस्त्र पोलिस दलाला (NAPF) सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, तर दुसरीकडे चीनदेखील त्यांच्या जवानांची संख्या वाढवत आहे. सीमेपासून १० किलोमीटर अंतरावर चीनने आपले जवान तैनात केले आहेत.

 नेपाळची कोलांटउडी

गेल्या काही दिवसांत चीनविरोधी भूमिका घेणा-या आणि भारताशी मैत्रीचा हात पुढे करणारा नेपाळही आता सातत्याने धोरणाबाबत कोलांटउड्या मारीत आहे. त्यापासूनही आपल्याला सावध राहण्याची आवश्यकता आहे. नेपाळने लिपुलेखवर आपला दावा केला. नेपाळ सरकारने लिपुलेख, लिम्पियाधुरा हे आपले प्रदेश असल्याचे सांगत नवा नकाशाही जारी केला होता. .

Related Articles

Back to top button