मराठी

लिपुलेख भागात चिनी क्षेपणास्त्रे

लिपुलेख सीमा भागावरून नेपाळ आणि भारतात वाद सुरू झाला आहे

लिपुलेख/दि. २१ – भारतासोबत सीमावादावर शांतता आणि चर्चेतून प्रश्न सोडवता येईल, अशी भूमिका चीनकडून घेतली जात असताना दुसरीकडे नेपाळनेही भारतासोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे; मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. चीनने आता लिपुलेख भागात क्षेपणास्त्र तैनातीची तयारी सुरू केली आहे.

लिपुलेख सीमा भागावरून नेपाळ आणि भारतात वाद सुरू झाला आहे. लिपुलेखचा काही भाग भारताकडे आहे, तर नेपाळकडे काही भाग आहे. मानसरोवरला जाण्यासाठी भारतीय भाविकांसाठी हा अतिशय जवळचा मार्ग आहे. या लिपुलेख भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. ओपनसोर्स इंटेलिजेन्सच्या उपग्रहाने छायाचित्रे पाठविली असून लिपुलेख भागात चिनी सैन्याच्या हालचाली वाढल्या आहेत. लिपुलेखजवळ ट्राय-जंक्शन भागात चीनने सैन्य तैनात केले आहे. त्याशिवाय क्षेपणास्त्रे तैनात करण्यासाठी बांधकाम सुरू केले आहे.
डेट्रेस्फाच्या छायाचित्रावरून या भागातील शंभर १०० किलोमीटर स्कॅनिंगमुळे ‘चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी‘च्या हालचालींची माहिती मिळत आहे. जमिनीतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे मानसरोवर तलावाजवळ तैनात करण्यात येत असल्याचे त्यात म्हटले जात आहे. चिनी सैन्याकडून या भागात मे २०२० पासून पायाभूत सुविधा आणि दीर्घकाळ राहण्यासाठीच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली आहे. लिपुलेख भागात भारत, नेपाळ आणि चीनची सीमा एकत्र येते. चीनने लिपुलेखमध्ये जवळपास एक हजार जवान तैनात केले आहेत.

भारताने आपल्या हद्दीत मानसरोवर यात्रेला जाणारया भाविकांसाठी रस्ता तयार केला आहे. भारताने तयार केलेल्या ८० किलोमीटर मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला. त्यानंतर नेपाळने आपला नवीन नकाशा प्रसिद्ध करून लिपुलेख, कालापानी आदी भागांवर दावा केला आहे.

लडाख परिसरात दळणवळण वाढविण्यावर चीनचा भर 

चिनी सैन्याने पँगोग त्सो आणि गोगरा-हॉट स्प्रिंग भागात फायबर ऑप्टिक केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. त्याआधी चीनकडून या भागात विजेच्या ताराही टाकण्याचे काम करण्यात आल्याची चर्चा होती. लडाख आणि अक्साई चीन भागातून चिनी सैन्य काही प्रमाणात मागे गेले आहे.

Back to top button