वरुड/दि. २२ – नागरिकांनो आत्महत्या करु नका, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष तथा माजी जेष्ठ सनदी अधिकारी कमलाकर देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केले आहे.
सद्य:च्या विज्ञान युगात दररोज आत्महत्या होत आहे. एरव्ही ग्रामीण भागात होणा:या आत्महत्या आता शहरी भागात होत आहे. त्यालाही जोड म्हणुन आता सामुहिक आत्महत्याचे प्रत्यक्ष वाढत आहे त्या थांबविण्याकरिता काळाची गरज आहे, आत्महत्या करणा:यांमध्ये खाकी जीवन जगणा:यांची संख्या अधिक प्रमाणात आहे. याला पर्याय म्हणुन तणावयुक्त जीवन जगण्यास शिका व प्रत्येकाशी स्पर्धा करु नये. आयुष्य खुप सुंदर आहे मनापासुन निसर्गाकडे पहा आनंदी रहा, राग येवु देवु नका, मानसिक प्रतीकार शक्ती वाढवा. आत्महत्या करणे हा मार्ग नसुन पळवाट आहे. आत्महत्या केल्यानंतर आपल्या कुटुंबाला किती त्रास होईल. त्यांना कोण मदत करेल? आपण जिवंत असतानांच आपल्या मुलाबाळांना कोणी मदत केली नाही तर आपण मेल्यानंतर त्यांचे काय होईल? याचा विचार करावा. तुम्ही एखाद्या मानसिक विंवचनेत असाल तर मानसोपचार तज्ञांची मदत घ्या आणि जीवनात आनंदाची बाग फुलु द्या, असे कळकळीचे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष तथा माजी जेष्ठ सनदी अधिकारी कमलाकर देशमुख यांनी केले आहे.