मराठी

राज्यांतर्गत पर्यटनावर नागरिकांचा भर

मुंबई दि १८कोरोनामुळे घसरणीला लागलेल्या पर्यटन उद्योगाची स्थिती आता सुधारत आहे. डिसेंबरमध्ये केरळ, गोवा, काश्मीर, उत्तराखंड, जयपूर, सिमला यांसारख्या पर्यटनस्थळांतील हॉटेलमध्ये 80-90 टक्के पर्यटक होते. बहुतांश राज्यांत स्थानिक पर्यटकच आहेत. फक्त हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि गोव्याचाच अपवाद आहे. डिसेंबरमध्ये बुकिंग ट्रेंडच्या आधारावर कंपन्यांनी 2021 साठी डेस्टिनेशन प्लॅनही बदलले आहेत. गोव्याच्या कळंगुट बीचवर जॉर्ज फर्नांडिस यांचे एक छोटेसे गेस्ट हाऊस आहे. कोविडमुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे, असे ते कोविड काळात सांगत असत; पण आता ते खूश आहेत. आमच्या गेस्ट हाऊसमधील 80 टक्के कॉट आरक्षित आहेत, असे ते सांगतात. गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले, की नववर्ष आणि दिवाळीला 90 टक्क्यांपेक्षा जास्त हॉटेल भरलेली होती. थ्री स्टार हॉटेल 70 टक्के, टू स्टार 80 टक्के आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये 95 टक्के खोल्या बुक होत्या. दुसरीकडे, काश्मीरमध्ये स्थिती सामान्य होत आहे. तेथे या वर्षी दशकातील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली. ख्रिसमस, नववर्षाच्या पार्ट्यांसाठी गुलमर्ग आणि पहलगामसारख्या ठिकाणी गर्दी होती. डिसेंबरमध्ये येथे रोज दोन हजारांपेक्षा जास्त पर्यटक येत होते. सध्या ही संख्या एक हजार आहे. आठ वर्षांत प्रथमच गुलमर्ग हाऊसफु आहे. चालू महिन्यात पर्यटकांचा आकडा 20 हजारांवर राहील, अशी लोकांना आशा आहे. केरळमध्येही वीकेंडला हॉटेलच्या 70 टक्के खोल्या आरक्षित आहेत.
अधिकृत आकड्यांनुसार, डिसेंबर 2020 मध्ये 75 हजार पर्यटक सिमल्याला आले; मात्र डिसेंबर 2019 मध्ये एक लाख तीस हजार लोक आले होते. जानेवारीत आतापर्यंत 44 हजार पर्यटक सिमल्याला आले तर जानेवारी 2020 च्या पहिल्या पंधरवड्यात 44 हजार लोक आले होते. ‘माय ट्रिप’चे देशातील चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विपुल प्रकाश यांनी सांगितले, की अनलॉकपासून डिसेंबरपर्यंत दरमहा 50 टक्क्यांच्या दराने हॉटेलचे बुकिंग वाढले. गोवा, जयपूर, उदयपूर, सिमला, मनाली, कुर्ग, उटी आणि पुद्दुचेरी येथे विक्रमी बुकिंगची नोंद झाली आहे. नव्या वर्षात आतापर्यंत उत्तराखंडमधील सर्व 3013 हॉटेल, होम स्टे आणि गेस्ट हाऊसचे 70 टक्के बुकिंग ऑनलाइन होत आहे. पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औलीचे सर्व हॉटेल आणि गढवालचे गेस्ट हाऊस भरलेले आहेत. चकराता, मसुरी, धनौल्टी, नैनिताल, मुक्तेडर, मुन्सायरी, सांकरी, हर्षिल यांसारख्या हिल स्टेशनला गर्दी आहे.
काश्मीरमध्ये ऑयटोबर 2020 मध्ये 2,697, नोव्हेंबरमध्ये 6,327 आणि डिसेंबरमध्ये 13,237 पर्यटक आले. डिसेंबर 2019 ची तुलना केली तर ही संख्या 88 टक्के जास्त आहे.

Related Articles

Back to top button