मराठी

सीमेवर चकमकीमुळे नागरिक दिवाळीला मुकले

श्रीनगर दि १५- दिवाळीच्या सणानिमित्तही पाकिस्तानच्या हरकती चालूच आहेत. पाकिस्तानी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करीत आहे. भारतीय सैन्यही चोख प्रत्युत्तर देत आहे. या सर्व घडामोडीत सीमानजीकच्या खेड्यातील नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. या वेळीही गावातील लोक दिवाळी साजरी करू शकणार नाहीत.
गेल्या सात दिवसांपासून पाकिस्तानने वातावरण खराब केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानबरोबर 720 किलोमीटर लांबीची नियंत्रण रेषा आहे. जम्मूच्या अखनूर सेक्टरपासून लडाखच्या कारगिल सेक्टरपर्यंत तसेच जम्मूमधील पुंछ आणि राजौरी जिल्हा, याशिवाय काश्मीरच्या उरी सेक्टर आणि बारामुल्ला जिल्ह्यात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार होत आहे. कोरोना कालावधीत पाकिस्तानकडून शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्याच्या घटना कमी झाल्या होत्या; परंतुगेल्या सात दिवसांपासून ती पुन्हा एकदा वाढली आहे.
दरम्यान, पाकिस्तानने 12 ते 15 वेळा युद्धबंदीचा भंग केला आहे. दिवाळीला मिठाई देण्याच्या वेळी गोळ्या झाडल्या जात आहेत. नियंत्रण रेषेवर तैनात असलेले भारतीय सैनिक दिवाळीच्या दिवशी पाकिस्तानी सैन्याला मिठाई देत असतात.  ही प्रदीर्घ परंपरा आहे; पण आता दोन्ही बाजूंकडून गोळ्या बरसल्या जात आहेत. उत्तर काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये लष्कराचे जवान हुतात्मा झाले आहेत. त्याचवेळी जम्मूमधील पूंछच्या सौजियान भागात सुमारे नऊ महिन्यांनंतर गोळीबार झाला. त्यात सहा स्थानिक नागरिक मरण पावले. बरेच लोक जखमीही आहेत. दिवाळीसाठी लोक खरेदी करीत होते आणि दुसरीकडे गोळीबार सुरू होता शुक्रवारी लोक दिवाळीनिमित्त खरेदी करत होते. दरम्यान, पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. पाकिस्तानने स्थानिक लोकांना लक्ष्य केले. प्रत्येक वेळी पाकिस्तान येथे सामान्य नागरिकांना लक्ष्य करते. लोक घाबरले आहेत. पूंछचे राम कुमार दत्ता म्हणतात, की मार्चपासून शूटआऊट थांबविण्यात आले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. इथली परिस्थिती बरीच वाईट आहे. दिवाळीत असा गोळीबार प्रथमच झाला. त्याच वेळी, सौजियानचे मोहम्मद इस्माईल म्हणतात, की स्थिती केवळ वाईटच नाही, येथे सुविधादेखील कमी आहेत. जखमींसाठी रुग्णवाहिकासुद्धा नाही.

Related Articles

Back to top button