मुंबई दि. ११ – कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीपोटी जास्तीत जास्त लोक प्रमाणित आरोग्य विमा पॉलिसी काढण्यावर भर देत आहेत. ज्या लोकांकडे आधीच नियमित आरोग्य विमा पॉलिसी आहे, ते हमी कव्हरेजसाठी अशा योजना विकत घेत आहेत. दहा जुलै रोजी या पॉलिसींची सुरुवात झाल्यापासून भारतातील सर्वांत मोठ्या पॉलिसी बाजाराने दररोज एक हजारांपेक्षा जास्त पॉलिसी विकण्याचा दावा केला आहे. जगातील विविध भागांतील सुमारे दोन कोटी लोकांना आपल्या विळख्यात घेतले. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे आणि मृतांची संख्या लवकरच दहा लाखांच्या वर जाईल, याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची अनेक नवीन प्रकरणे दररोज नोंदविली जात आहेत आणि देशात संक्रमित रूग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. सुमारे ४५ हजार लोकांना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर लसीकरण होण्याची शक्यता अद्याप दूर असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे सरकार आपले काम करत असताना दुसरीकडे विषाणूचा प्रसार होऊ नये, म्हणून खबरदारीच्या उपाययोजना करण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले, तर विमा पॉलिसी आपल्याला उपयोगी पडेल, असाल तर आपली आरोग्य विमा योजना आपल्याला उपचारांच्या खर्चापासून वाचवेल, या दृष्टिकोनातून आता कोरोना विमा काढण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. दरमहा ८००-१००० रुपये नाममात्र qकमतीवर विमा पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ने सर्वसामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांना ग्राहकांसाठी लवकरात लवकर एक मानक तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पॉलिसीबझारमध्ये असेही आढळले आहे, की पाच महिन्यांच्या कोरोना-केंद्रित पॉलिसीला लोक प्राधान्य देतात.