मराठी

ज्योतिरादित्य शिंदेंचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा

भोपाळ//दि.११  – मध्य प्रदेश विधानसभेच्या पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाला दणदणीत विजय मिळाल्याने खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.
काही काळापूर्वी शिंदे समर्थक २२ आमदार भाजप सामील झाले. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार कोसळले. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने २८ पैकी १९ जागा मिळविल्या. त्यात शिंदे यांचा मोठा वाटा आहे. ही पोटनिवडणूक कमलनाथ आणि ज्योतिरादित्य यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न बनली होती. शिंदे यांना मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे रागावून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कमलनाथ यांच्या अनुभवी राजकारणाला शिंदे यांनी छेद दिला. शिंदे यांच्या समर्थकांचा विजय शिवराजसिंह चाैहान यांच्या सरकारला स्थैर्य मिळवून देणार आहे. त्याचबरोबर या विजयाने त्याच्यासाठी मंत्रिमंडळात जाणअयाचा मार्ग खुला झाला आहे.
केंद्रातील मंत्रिमंडळात शिंदे यांचा समावेश होऊ शकतो. भाजपत प्रवेश केला, तेव्हाच त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळेल, असे सांगितले जात होते; परंतु त्या वेळी जे मिळाले नाही, ते आता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलीकडच्या काळात मोदी मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे अन्य मंत्र्यांवर ती जबाबदारी सोपविण्यात आली. आधीच मोदी मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांकडे बरीच अतिरिक्त मंत्रालयांची जबाबदारी आहे. मोदी मंत्रिमंडळातील काही मंत्री सातहून अधिक  मंत्रालयाची जबाबदारी पाहत आहेत. कामाचा भार कमी करावा, अशी काही मंत्र्यांची मागणी आहे. शिंदे यांचे ब-याच काळापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहे, ते आता त्यांना मिळण्याची शक्यता आहे. एकेकाळी राहुल गांधी यांच्या युवक काँग्रेसच्या ब्रिगेडचा भाग असलेले ज्योतिरादित्य यांनी २०१२ च्या मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपकडून पराभवाचा सामना करावा लागला. ते सध्या भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत.

Related Articles

Back to top button