मुंबई/दि ३० – मानसिक गोंधळ दूर करण्यासाठी पाय-या चढण्याची सवय लावा. ही सवय ताजेतवाने आणि उत्साही ठेवण्यासाठी मदत करते, असा निष्कर्ष जर्मनीच्या सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थने काढला आहे.
या सवयीमुळे साथीच्या काळातही मेंटल डिसऑर्डर कमी होतो. संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतात, की जेव्हा आपण पाय-या चढतो, तेव्हा आपण ऊर्जेने भरलेले असतो आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. ही सवय आपले आरोग्य निरोगी ठेवते. साथीच्या काळात घराच्या पाय-या वापरा. सध्या कोरानामुळे लोक बाहेर पडणे टाळतात. त्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असे सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थचे प्रोफेसर हेक टोस्ट म्हणतात. त्यासाठी पाय-या चढणे हा एक उत्तम पर्याय आहे.
पाय-या चढण्यामुळे होणारे फायदे समजून घेण्यासाठी 67 लोकांवर सात दिवस संशोधन करण्यात आले. संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत, की पाय-या चढणारे लवकरच लोक ऊर्जेने भरलेले दिसले. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम झाला. दुस-या 83 लोकांच्या गटात संशोधन केले गेले. संशोधनात सामील झालेल्यांच्या चुंबकीय अनुनाद टोमोग्राफीचा शोध घेण्यात आला. शास्त्रज्ञ म्हणतात, आम्ही मेंदूचा तो भाग ओळखला, ज्यामध्ये मनुष्यांची क्रिया आणि त्यांचे आरोग्य दिसून येते. संशोधनात असे दिसून आले आहे, की मानसिक विकाराने ग्रस्त लोक कमी ऊर्जा अनुभवतात, म्हणून शरीर सक्रिय ठेवणे महत्वाचे आहे. चालण्याचे आपल्याला बरेच फायदे मिळतात. जर आपल्याला रक्तदाब कमी करायचा असेल तर तीन मिनिटे चाला आणि जर आपल्याला शरीराची चरबी कमी करायची असेल तर अन्न खाल्यानंतर 30 मिनिटे चाला. ब-याच संशोधनात हे सिद्ध झाले आहे, की चालताना शरीराचा अनेक प्रकारे फायदा होतो. शास्त्रज्ञ म्हणतात, आपण चालताना किती वेगात चालत आहात, याचा शरीरावरही परिणाम होतो. चार किलोमीटर आपण चालत असल्यास, स्मृतीची जोखीम कमी होते. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सहा हजार महिलांवरील अभ्यासानुसार असे म्हटले आहे, की जर एखादी महिला दररोज चार किलोमीटर चालत राहिली तर मेमरी कमी होण्याचा धोका 17 टक्के कमी होतो. याला सामान्य भाषेत अल्झायमर देखील म्हणतात.