मराठी

१८ वर्षानंतर मुंबईचा वीजपुरवठा खंडीत मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत गोंधळ

मुंबई/दि. १२ – ग्रीड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. या प्रकारामुळे काही काळासाठी गोंधळ उडाला. दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत. आज झालेल्या ग्रीड फेलचा रस्ते वाहतुकीसह लोकल सेवेला फटका बसला. तसेच ऑनलाईन वर्ग रद्द तर झाले तर परीक्षाही पुढे ढकलल्या गेल्या. वीजपुरवठा खंडित झाल्याने कोरोना हॉस्पिटलचा पॉवर बॅकअप सुरू करा, अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या. मंत्रालयासह सरकारी कार्यालये, बँका, न्यायालये काही काळ अंधारात गेल्याचे चित्र होते. भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्या, असे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त इकबाल qसह चहल यांनी दिले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले. मुंबईत वीज नेमकी कशी खंडित झाली, याच्या चौकशीचे राज्य सरकारने आदेश दिले. ग्रीड फेल झाल्यामुळे संपूर्ण मुंबई विभागातील ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील वीजप्रवाह खंडीत झाला होता. काही तासानंतर हा वीज पुरवठा पूर्ववत झाला. याबाबत बेस्ट इलेक्ट्रिसिटीने ट्विटमध्ये असे म्हटले की, टाटाकडून येणा-या वीज पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला. यामुळे शहरातील कार्यालये, लोकल रेल्वे ठप्प झाली असून रुग्णालयांनाही याचा फटका बसला आहे. ग्रीड बिघाड झाल्याने शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला असल्याची पुष्टी बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बेस्ट च्या प्रवक्त्याने दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ४०० केव्हीची लाइन खराब झाली आहे. यामुळे एमआयडीसी, पालघर, डहाणू भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत झाला. राज्य सरकारने या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत.

अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे बत्ती गुल

मुंबईत २००० मेगावॉटच्या वर वीजपुरवठा खंडीत होणे हे दुर्भाग्यपूर्ण असून महाराष्ट्राची बदनामी करणारे आहे. गेल्या तीन दिवसांपासून कळवा ते तळेगाव वीजवाहिनी ब्रेकडाऊनमध्ये असून दुरूस्त केलेली नाही. मुंबईला वीजपुरवठा करण्याकरता कळव्याला फिडिंग करावे लागते. त्यानंतर कळवा ते पडघा ही वीजवाहिनी सात वाजता ब्रेकडाऊनमध्ये गेली. आपल्या महाराष्ट्रातील ट्रान्समिशन आणि इतर वीज उपकरणे आधुनिक आहेत. त्यामुळे कुठेतरी दुर्लक्ष झालेय वीजवाहिनी लगेच दुरुस्त केली गेली नाही. तसेच अधिकाèयांनीही हलगर्जीपणा केला. कारण पहिली वीजवाहिनी जेव्हा ब्रेकडाऊन झाली, त्या वेळी ते १५ मिनिटांत दुरूस्त करणे गरजेचे होते. आपल्याकडे आधुनिक उपकरणे असतानाही ते केले गेले नाही, अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Related Articles

Back to top button