मराठी

आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे हस्ते विकासकामांचे भुमीपुजन व लोकार्पण

  सुफीयान पार्क व गुलीस्तानगर येथे रस्ता खडीकरणामुळे नागरीकांच्या सुविधेत भर

  • लालखडी परीसर पाहणी दरम्यान समस्या निकाली काढण्याच्या संबंधीतांना सुचना

अमरावती प्रतिनीधी दि १८ :-  अमरावती मनपा क्षेत्राअंतर्गत नागरीकांच्या समस्या जाणुन घेण्यासह त्या समस्यांचे तात्काळ निराकरण करीत नागरीकांना अपेक्षीत सुविधांची पुर्तता करण्यासाठी आ. सौ. सुलभाताई खोडके (MLA Sulbhatai Khodke) यांचे वतीने स्थानीकांसोबत थेट-भेट घेवुन संवाद साधण्यासह विकासकामांची गतीने पूर्तता करण्यावर सातत्यपुर्ण भर दिल्या जात आहे. अशातच शुक्रवारी मनपा क्षेत्राअंर्गत प्रभाग क्र – 3 नवसारी स्थित सुफीयान पार्क येथील डॅा. सोहेल ते बाबाभाई रिक्षावाले यांचे घरापर्यंत रस्ता खडीकरण कामाचे आ. सौ. सुलभाताई खोडके यांचे हस्ते लोकार्पण करण्यात आले. तद्नंनंतर गुलीस्तानगर येथील सोहेलभाई ते आशीक सुलेमान यांचे घरासमोरील रस्त्याचे खडीकरणाच्या कामाची आमदार महोदयांनी कुदळ मारीत औपचारिकता  साधली. सुनियोजीत विकासकामांचा आराखडा तसेच स्थानीय जनतेच्या विश्वासानुरुप विकसनशिल शहराचे स्वप्न जनतेच्या पाठबळावर साकारण्यार्थ आपण कटीबध्द आहोत. अशी भूमिका स्थानीकांशी संवाद साधतांना आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी  व्यक्त केली.
या दरम्यान प्रभाग क्रमांक -४  जमिल कॅालनी स्थित लालखडी, उस्मान नगर, हाजरा नगर, मेहबुब नगर, यास्मिन नगर या भागातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार महोदयांनी थेटभेट देवुन या परीसरातील समस्यांची पाहणी सुध्दा केली. यावेळी उस्मान नगर येथील नालीची समस्या लक्षात घेता सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने तसेच पाणी प्रवाहीत होत नसल्याचे बाबींकडे स्थानीकांचे वतीने यावेळी आमदार महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. जनतेचे आरोग्य अबाधीत राखण्याकरीता या समस्येवर योग्य तोडगा काढण्यासह या करीता उचीत उपाययोजनांची यथाशिघ्र अंमलबजावणी करण्यात यावी. मनपा प्रशासनाचे संबंधीतांना या पाहणी दरम्यान त्यांनी आदेशीत सुध्दा केले. यास्मिन नगर येथे रस्ते सुविधा उपलब्धी अभावी अवागमन करतांना नागरीकांना होणा-या त्रासा संदर्भात नागरीकांचे वतीने त्यांना यावेळी अवगत करण्यात आले.
नागरीकांच्या मागणीची दखल घेवुन आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी संबंधीत कामे ही मुलभुत सुविधांची असल्याने ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रस्तावीत असुन, या कामांची सुध्दा प्राधान्य क्रमाने पुर्तता केल्या जाईल. असा मनोदय सुध्दा आ. सुलभाताई खोडके यांनी  यावेळी व्यक्त केला. दर्जेदार, गुणवत्तापुर्ण विकासकामांचे पुर्ततेसाठी निधीची उपलब्धता करण्यासह येणा-या अडचणी दुर करणे,  तथा जनतेचा संपादन केलेला विश्वास कायम राखीत उद्दिष्टांची  जबाबदारी पुर्णत्वास नेण्यासाठी नियोजन करण्यासह सर्वांशी समन्वय ठेवुन शहरातील विविध प्रभागांमध्ये आता पायाभुत सुविधांची पुर्तता केल्या जाईल. या शब्दांमध्ये संवाद साधीत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी जनसंपर्कातुन जनाधार लाभल्याचे सांगीतले. आमदार महोदयांनी यावेळी नागरीकांचे वतीने विकास कार्यक्रमाचे पुर्ततेकरीता केल्या जाणारे सातत्यपुर्ण सहकार्य व नोंदविल्या जाणा-या सहभागाबद्दल सर्वसामान्यांप्रती या दरम्यान कृतज्ञता सुध्दा व्यक्त केली.
या विकासात्मक कामांच्या लोकार्पण तथा भुमीपुजन कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता – विनोद बोरसे, मनपाचे अभियंता – प्रदिप वानखडे, यश खोडके, सनाभाई ठेकेदार,ऍड . शोएब खान, सादीक रजा, गाजी जाहेरोश , नदीम मुल्ला , हबीब मामु, बब्बुभाई ड्रायव्हर, असलम खान पठाण, याया खॅा पठाण, जम्मु भाऊ किराणा, सज्जु वेल्डर, मुमताज मॅडम, शेख रीयाज,  नईम खान, फहीम भाई, सैय्यद साबीर, मोहम्मद फारुकी, अफजल भाई, शमीउल्ला खॅा, फिरोज भाई, अफसर बेग, शारीक भाई, मेराज खॅा पठाण, शफी पहेलवान, आहत अली, वहीद भाई, सादीक भाई, आसीफ भाई, निसारभाई मंसुरी, हाजी रफीक भाई, नसीमभाई पप्पु, मुजमिल्ल हाफीज साहब, मोहम्मदभाई सलीम, काझी इरफानउद्दीन, जलील भाई, शेख वझीर भाई, सैय्यद नईम, मोहम्मद सोहेल, सैय्यद अजीज, अब्दुलभाई आरिफ , फीरोज खान, शेख मोबिन आदी परीसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button