मराठी

आईच्या कामाने आ. पवार भावुक

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी

नगर/दि. १२आमदार रोहित पवार या आपल्या मुलाच्या मतदारसंघाचे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नाव उंचावण्यासाठी त्यांच्या मातोश्री बारामती ग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार या स्वतः स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत. कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून व्हावी‘ हा मूलमंत्र देणारया सुनंदा पवार यांनी स्थानिक पातळीवर उतरून स्वच्छतेची सुरुवात केली आहेत. गवत,काट्यात हात घालून परिसर स्वच्छ करण्याची त्यांची ही ‘जिद्द‘ अनेकांना प्रेरणादायी ठरू लागली आहे. केंद्र सरकारची नगरपंचायतीसाठी स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा असते. या स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने भाग घेतला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कर्जतचा प्रथम क्रमांक कसा येईल, याबाबत आता जागरूकता निर्माण होत आहे. ‘आधी करावे मग सांगावे‘ या वचनाचे पालन करत आता अनेक राजकीय पदाधिकारी, शासकीय अधिकारी, नगरपंचायत अधिकारी-कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्था आणि संघटना वेगवेगळ्या प्रभागात जात स्वच्छतेच्या कामासाठी झोकून देत काम करत आहेत. सुनंदा पवार या देखील नागरिकांसोबत श्रमदानात सहभागी होत स्वच्छतेचे काम करताना दिसत आहेत. आमदारांच्या शपथविधीत रोहित पवार यांनी रोहित सुनंदा राजेंद्र पवार असा आपल्या नावाचा उल्लेख करून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. आपल्या आईच्या नावाचा उल्लेख करून पवार यांनी आपल्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. रोहित यांच्या मातोश्री सुनंदा पवार यादेखील आमदार मुलाच्या खांद्याला खांदा लावून रोहित यांच्या मतदारसंघात विकासासाठी झटत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा दिसून आले आहे.

Related Articles

Back to top button