नवी दिल्ली/दि. १८ – देशातील नोक-यांची संख्या घटल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस रणदीपसिंह सुरजेवाला यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. गेल्या चार महिन्यांत 66 लाख रोजगार गमावले. ज्यांची नोकरी गेली आहे, ते सर्व अभियंता, डॉक्टर, शिक्षक आणि लेखापाल आहेत, असे त्यांनी एका अहवालाचा आधार घेऊन सांगितले. देशात 14 कोटी लोकांचा रोजगार गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतानाते म्हणाले, की एक कोटी ७५ लाख लघु उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मोदी असतील तर ते शक्य आहे, या घोषणेला उद्देशून त्यांनी उद्योगाच्या या स्थितीलाही मोदी यांनाच जबाबदार धरले. सुरजेवाला यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारत एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या नोक-या जात असताना सरकार काय करीत आहे. ते म्हणाले, की लोकांच्या खिशात पैसे नाहीत. दररोज नोक-या गमावल्या जातात आणि महागाई वाढते आहे. मोदी सरकार कोठे आणि काय करीत आहे? मोदी आणि चलनवाढ दोन्ही हानीकारक आहेत, अशी टीका त्यांनी केली.