मराठी

काँग्रेसजन लागले परस्परांचे गळे धरायला

नेत्यांच्या पातळीवरील समजोता खालपर्यंत पोचलाच नाही

जयपूर/दि. २१ – दीड महिन्यांच्या राजकीय संघर्षानंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वाद कायम आहे. दोन्ही गटातील मतभेद वाढत आहेत. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गळ्यात गळे घालणारे आता पुन्हा गळे धरायला लागले आहेत.

या राजकीय मतभेदांची लढाई भरतपूर जिल्ह्यात पाहायला मिळाली. गेहलोट गटाचे एक आमदार आले, तेव्हा पायलट समर्थकांनी घोषणाबाजी केली. बसपचे दरसील येथील आमदार जोगिंदरसिंग आवाना काँग्रेसमध्ये दाखल झाले. त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते गेहलोत गटाचे आहेत. ते भरतपूर येथे पोहोचल्यावर पायलट समर्थकांनी पायलट यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करून आवना समर्थकांना ठोसे लगावले. परिस्थिती अशी बनली, की आवानाची बाजू घेणा-यांचा पाठलाग करून पायलट समर्थक घोषणाबाजी करीत. त्यांची कोंडी करीत. यामुळे आवाना यांना अस्वस्थ वाटू लागले; परंतु पायलट समर्थकांनी पिच्छा सोडला नाही. पायलट समर्थकांपैकी गुर्जर समाजातील बहुतेक सदस्य असे म्हणतात, की आवाना स्वतः गुर्जर आहेत. हा त्रास पाहून आवाना शेवटी गाडीत बसून जयपूरला रवाना झाले.

गेहलोत आणि पायलट यांच्यात दीर्घ राजकीय संघर्षानंतर दिल्लीत केंद्रीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे दोघांमध्ये राजकीय सामंजस्य निर्माण झाले; परंतु मतभेद अजूनही कायम आहेत. दोन्ही गटातील नेते संधी मिळेल, तेव्हा एकमेकांची उणीदुणी काढतात. सार्वजनिकरित्या दोन्ही गटांतून मतभेद नसल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात विधानांमध्ये आणि वागण्यात तफावत दिसते. दोन दिवसांपूर्वी जेव्हा पायलट त्यांच्या मतदारसंघात टोंक येथे गेले, तेव्हा गेहलोट समर्थकांना दौ-यापासून दूर ठेवले.

Related Articles

Back to top button