लोणी टाकळी/दि.१ – दाभा मंडळातील मौजे निंभोरा लाहे शेत शिवारातील सर्वे नंबर ५१/१,५१/२,५१/२ अ ५१/३ मधील क्षेत्रफळ अंतर्गत नऊ एकर शेती मध्ये नऊ बॅग सोयाबीन पेरले असता फक्त तीन पोते सोयाबीन पिकाचे उत्पादन झाल्याने प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकरी विमल सुधाकर चौ दरी यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे
मागील पावसाळ्यातील जून जुलै महिन्यात महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरणी केली होती.शेताचे आजू बाजू ला चागले पीक असताना व पाऊस सुध्धा समाधानकारक पडला असताना पिकाची परिस्तिथी अत्यंत खराब झाली होती.याबाबत १५ जुलै रोजी नांदगाव खंडेश्वर तालुका पंचायत समिती कृषी अधिकारी यांना तक्रार केली होती,याबाबत लोणी टाकळी कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक यांनी पाहणी करून अहवाल सादर केला असल्याचे संगितले होते.
नऊ बॅग सोयाबीन, खत,फवारणी करून लाखो रुपये खर्च यावर करण्यात आला .बोगस बियाणे व सततची पावसाची रिपरिप सुरूच असल्याने पीक समाधानकारक झाले नाही .१ नोव्हेबर रोजी कापणी करून मळणी यंत्र मधून काढले असता फक्त अडीच ते तीन पोते सोयाबीन झाले असल्यामुळे मजुरांचे मजुरी पैसे देणे कठीण झाले आहे .सदर शेतकऱ्याला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.