मराठी

स्टील आयातीवर कर लादण्याचा विचार

नवी दिल्ली/दि. २५ – जपान आणि कोरियासह काही देशांकडून विशिष्ट प्रकारच्या स्टील आयातीवर केंद्र सरकार पाच वर्षापर्यंत अँटी डम्पिंग शुल्क लागू करू शकते. स्वस्त आयात केलेल्या स्टीलपासून देशांतर्गत उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी सरकार हे पाऊल उचलू शकते. वाणिज्य मंत्रालयाने ही शिफारस केली आहे.
मंत्रालयाच्या अन्वेषण शाखा डीजीटीआरने जारी केलेल्या अधिसूचनेत स्टेनलेस स्टीलच्या फ्लॅट रोल्ड उत्पादनांवर अँटी-डम्पिंग शुल्क पाच वर्षांसाठी लावण्याची शिफारस केली आहे. डीजीटीआरने युरोपीय संघ, जपान, कोरिया, मलेशिया आणि तैवान येथून आयात केलेल्या स्टीलवर अँटी-डम्पिंग शुल्क लावण्याची शिफारस केली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेड रेमेडीज (डीजीटीआर) च्या शिफारशीनुसार आयात केलेल्या स्टीलवर प्रति टन 67 ते 944 डॉलर्सची अँटी-डंपिंग ड्युटी लागू करावी. तथापि, या संदर्भातील अंतिम निर्णय अर्थ मंत्रालयाने घ्यायचा आहे. डीजीटीआरचे म्हणणे आहे,  की या देशांकडून आकारल्या जाणा-या डम्पिंग ड्युटीच्या चौकशीनंतरच अँटी डम्पिंग ड्युटी लावण्याची शिफारस केली गेली आहे.
डीजीटीआरच्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे, की तपासणीनंतर संचालनालयाने असा निष्कर्ष काढला आहे, की या देशांकडून भारतात पाठविल्या जाणा-या वस्तूंची गुणवत्ता ही त्याच्या सामान्य मूल्यापेक्षा कमी आहे. या कारणास्तव, या उत्पादनांना डंपिंग म्हणून वर्गीकृत केले जाते. अधिसूचनेनुसार, घरगुती उद्योग खराब वस्तूंच्या समस्येशी झगडत आहे. घरगुती उत्पादकांच्या तक्रारीनंतरच हा तपास केला गेला. अँटी-डम्पिंग ड्युटी म्हणजे काय आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रात जेव्हा एखादा देश किंवा फर्म देशांतर्गत बाजाराच्या तुलनेत कमी किंमतीत उत्पादनाची निर्यात करते, तेव्हा त्याला डंपिंग म्हणतात. मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाच्या नफ्यावर परिणाम होतो. जागतिक व्यापार नियमांनुसार, देशांतर्गत उत्पादकांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशांना डम्पिंग उत्पादनांवर शुल्क लागू करण्याची परवानगी आहे. ग्लोबल ट्रेड नियमांनुसार डम्पिंग उत्पादनांवर ड्युटी एका न्यायिक मंडळाने तपासणी केल्यानंतरच लागू केली जाते. डीजीटीआर भारतात अशी तपासणी करते. जागतिक व्यापार संघटनेच्या यंत्रणेला अँटी डम्पिंग शुल्क लावण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे शुल्क लादण्याचा उद्देश म्हणजे फेअर ट्रेड प्रॅक्टिस आणि देशांतर्गत उत्पादनांना समान संधी देणे असे आहे.

Back to top button