मराठी

संततधार पाऊस शेतक:यांच्या मुळावर

सोयाबीन, कापुस, ज्वारी, तुर, मुग, मिरचीच्या उत्पन्नात ५० टक्के फटका

वरुड दी २ – तालुक्यात मागील १० ऑगस्टपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे खरिपाच्या हंगामातील सोयाबीन, ज्वारी, कपाशी, मूग, तुर, मिरचीचे पिके धोक्यात आली असून अतिपावसाने कपाशी, तुर वाळत आहेत. परिणामी शेतक:यांच्या मुला बाळांच्या ताटातून तुरीची डाळ गायब होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यावर्षी रोहिण्याचा पाऊस चांगला बरसला. त्यानंतर मृग नक्षत्रात ही उत्तम पावसाची नोंद झाली. पावसाने यावर्षी सातत्य टिकवून ठेवत खरिपाच्या पेरणीच्या पिकांना उत्तम साथ दिली. तालुक्यातील मागील आठवड्यापासून सतत ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे कपाशी पिकाची कायिक वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. पीक फुलोरा व बोंड्या भरण्याच्या अवस्थेत असताना सतत पाऊस पडत असल्यामुळे पिकांच्या मुळया अन्नद्रव्ये घेऊ शकत नाही. परिणामी सोयाबीन पीक पिवळे पडून व शेंगावर करपा रोगामुळे हाती आलेले पीक मरत आहे. कपाशी पिकावरील मर रोग आकस्मिक उधळी, भरपूर व सतत पाऊस झाल्यामुळे जमिनीत अतिरिक्त पाऊस साठल्यामुळे जमिनीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे झाडाच्या संरचनेचा पूर्णपणे नाश व आकस्मिक या विकृतीचे लक्षणे दिसत आहे. हळद रोग जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्याने हळद पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेंड्यापासून झाड पिवळे पडून वाळत आहे. बुंध्याचा भाग सडत असल्यामुळे सहज उपटत आहे. जमिनीतील गड्डे सडत आहे. यंदाच्या खरीप हंगामातील मान्सुनने जोरदार हजेरी लावली असून सगळीकडे दमदार पाऊस झाला आहे. तालुक्यातील मागील १० ऑगस्टपासून संततधार पाऊस होत आहे, त्यामुळे तालुक्यातील चुडामन नदीला पूर आला आहे. काही शेतक:यांच्या शेतात पाणी शिरले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचे तहसिल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करुन शेतक:यांना मदत द्यावी, अशी मागणी वरुड तालुक्यातील शेतकरी सहांगूजी कुडसिंगे, तुळशिराम मोरोपे, विनायक गोहाड, कैलास चोरे, विनोद खनखने यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button