अंजनगाव सूर्जी.प्रतिनिधी/२२ सप्टेंबर : तालूक्यात सतत दहा बारा दिवसापासून होत असलेला पाऊस दररोज आपलेच रेकाँर्ड तोडत असून आज दि. 22 ला आलेल्या पावसाने तालुक्यातील सर्व नद्यांना पुर आला असून नद्या ओहर फ्लो होऊन वाहत आहे.
तालूक्यात सतत गेल्या दहा बारा दिवसापासून पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.यामुळे शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून.आता शेतातील माति खरडुन जाईल का अशी भीती वाटत असून येणारा पाऊस दररोज आपलेच रेकाँर्ड तोडुन नव्याने रेकॉर्ड बनवत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे तालूक्यासाठी वरदान असलेले शहानूर धरण केव्हाच शंभर टक्के भरले असून दरोज पाण्याचा विसर्ग सूरु आहे.दि.22 ला 50 से.मी ने दोन दरवाजे ऊघडल्याने अंजनगांव सुर्जीचा मुख्य संपर्क असलेला पाचवलीचा पुल पाण्याखाली होता.तर तालूक्यातील निमखेड बाजार,चौसाळा ,हिरापूर येथून वाहणार्या बेलगंगा नदि दूथळी भरुन वाहत होती.तर खिराळा येथिल नदिला दररोजच पुर येत असून तेथिल पुलाची ऊंची कमी असल्याने, चिंचोणा, हिरापुर, निमखेड, खिराळा, येथील नागरिकांचा अंजनगाव सूर्जी शहराशी संपर्क तूटत असून कामानिमित्त शहरात आलेल्या नागरिकांना तासोनतास पुर ओसरेपर्यंत बसून राहावे लागत असल्याचे चित्र या दहाबारा दिवसात पहायला मिळत आहे. आणखी हा पाऊस किती दिवस राहणार याच्यावर बरेच निर्भर असून सोंगायला आलेले काही सोयाबीन, कपाशी खराब होत असल्याचे चित्र अंजनगांव सूर्जी तालूक्यात निर्माण झाले आहे.