मराठी

कोरोनाचा फायदाः ७३ हजारांहून अधिक घरे पूर्ण

पुणे/दि. १२ – गेल्या वर्षी 73 हजाराहून अधिक घरे पूर्ण झाली. हे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले होते. २०२० मध्ये रिअल्टी सेक्टरने 190 अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. हे सर्व प्रकल्प 2013 आणि त्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. खराब काळातून जात असलेल्या देशातील रिअल्टी क्षेत्राचे कोरोनाने पुनरुज्जीवन केले.
कोरोना संकटाच्या वेळी या क्षेत्राने मागील वर्षी 190 अपूर्ण प्रकल्प पूर्ण केले. या प्रकल्पात एकूण 73 हजार 560 घरे होती. हे सर्व प्रकल्प 2013 आणि त्यापूर्वी सुरू करण्यात आले होते; पण ते पूर्ण होऊ शकले नव्हते. सध्या त्यांचे मूल्य सात लाख सात हजार कोटींपेक्षा जास्त आहे. गेल्या वर्षी ज्या शहरात रखडलेल्या प्रकल्पांचे काम केले गेले, त्यात मुंबईचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेशात २०२० मध्ये 84 रखडलेले प्रकल्प पूर्ण झाले आहेत. सुमारे एक लाख ऐंशी हजार युनिट्स अजूनही अपूर्ण आहेत. त्यांचे मूल्य दोन लाक कोटींपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) मध्ये सुमारे एक लाख नव्वद हजार प्रकल्प रखडले आहेत. त्यांचे मूल्य एक लाख 19 हजार कोटी रुपये आहे.
सध्या एनसीआर आणि एमएमआर मधील 74 टक्के प्रकल्प प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत दक्षिणेतील बंगळूर, चेन्नई आणि हैदराबादमध्ये केवळ आठ टक्के प्रकल्प रखडले आहेत. पुण्यात अंदाजे 16 टक्के प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. त्याचबरोबर कोलकात्यात अपूर्ण प्रकल्पांची संख्या दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे.

Related Articles

Back to top button