मराठी

जिल्हापरिषदेमधील कोरोनायोध्ये वेतनाविनाच

तात्काळ वेतन देण्याची निवेदिता चौधरी यांची मागणी

अमरावती/दि.२७ – अमरावती जिल्हापरीषद अंतर्गत आयुर्वेद दवाखान्यामध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकारी  व अर्ध वैद्यकीय स्टाफ मागील तीन महिन्यापासून वेतनाशिवाय कार्यरत आहे.त्यांना तात्काळ वेतन अदा करण्याची मागणी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे केली आहे.कोरोनाच्या काळात डॉक्टरांपासून शासन कोरोनयोध्ये म्हणून कर्तव्य बजावून घेत आहे,प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून जनतेचे प्राण वाचावीत आहे असे असताना डॉक्टरांना प्रशासकीय  दिरंगाईमुळे वेतनच अदा केल्या गेले नाही. यापूर्वी डॉक्टरांना नियमित वेतन मिळत होते परंतु मागील सात महिन्यापासून कधीच वेळेवर वेतन होत नसल्याने कोरोनायोध्ये त्रस्त आहे एकीकडे जीव धोक्यात घालायाचा व दुसरीकडे पदरमोड करून प्रपंच चालवायचा अशी पाळी कोरोनयोध्यावर जिल्हा परिषेदेने आणली आहे. पीडित वैद्यकीय अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सात दिवसाच्या आत वेतन न मिळाल्यास भाजपाच्या वतीने अमरावती जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात येईल अशी माहिती भाजपाच्या अमरावती जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी दिघडे यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button