मराठी

कोरोनामुळे दहा हजार कंपन्या बंद

मुंबई/दि.9 – कोरोना संकटामुळे हजारो कंपन्या कायमच्या बंद झाल्या आहेत. ही माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या टाळेबंदीमुळेऔद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यात अनेक लहान कंपन्या व उद्योग नष्ट झाले आहेत.
एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात कंपनी व्यवहार व्यवहार विभागाच्या आकडेवारीनुसार दहा हजार 113 कंपन्यांना कायमचेटाळेलागले आहे. यामुळे हजारोमजुरांची अवस्थाही वाईट झाली आहे. कलम 288 (2) नुसार देशातील दहा हजार 111 कंपन्यांनी स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली. कंपनी कंपन्यांच्या मंत्रालयाकडून या कंपन्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलेआहे. दिल्लीत सर्वाधिक बंद कंपन्या आहेत. गेल्या 11 महिन्यांत दिल्लीतील सर्वाधिक दोन हजार 394 कंपन्या बंद झाल्या आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एक हजार 936 कंपन्यांना टाळे ठोकण्यात आले आहेत.
तामीळनाडूमध्येयाच काळात एक हजार 322 कंपन्यांना आपलेशटर बंद करावे लागले. त्याचबरोबर महाराष्ट्रात एक हजार 279 कंपन्या कायमच्या बंद झाल्या. कोरोना संकटामुळे जवळपास सर्वप्रमुख राज्यांमध्ये कंपन्यांना कुलूप ठोकले गेलेआहे. कर्नाटकमध्ये836 कंपन्या बंद झाल्या आहेत. त्याचबरोबर, चंदीगडमधील 101 कंपन्या, राजस्थानमधील 777 कंपन्या, तेलंगणात 404 कंपन्या, केरळमधील 707 कंपन्या, झारखंडमधील 17 कंपन्या, मध्य प्रदेशात 111 कंपन्या आणि बिहारमधील 104 कंपन्या कायमसाठी बंद आहेत.

Back to top button