मराठी

हॉस्पिटलवरून उडी मारून कोरोनाबाधिताची आत्महत्या

नगरः नगर शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide by jumping from the third floor) केली. उपचार चालू असतानाच त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गोरक्ष महादेव मतकर (वय ३३) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. मृत्य झालेली व्यक्ती नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मूळ रहिवाशी आहे. आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीवर गेल्या दहा दिवसांपासून शिरूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान तो सुरभी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने पळत येऊन हॉस्पिटलची काच तोडून थेट तिसèया मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

Back to top button