मराठी

अजित पवारांना कोरोनाची लक्षणे

सार्वजनिक कार्यक्रमात न जाण्याचा निर्णय

मुंबई/दि.२२  – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. पवार यांची तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली आहे; मात्र कोरोनाचा अहवाल नकारात्मक आला  आहे; परंतु थंडी, तापासारखी लक्षणे असल्याने त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात न जाण्याचे ठरवले आहे. तसेच आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या, अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
असे असले तरी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला  अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. अजित पवार बुधवारी मंत्रालयात अनुपस्थितीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पॅकेज देण्यावर होणारी मंत्रिमंडळाची कालची आणि आजची बैठक रद्द झाली आहे. आता शुक्रवारी ही बैठक होणार आहे.  आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही त्यांनी  रद्द केला आहे.

Related Articles

Back to top button