मुंबई /नगर दि.१७ – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान ‘सिल्व्हर ओक‘ येथील १२ कर्मचाèयांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे शरद पवार यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दुजोरा दिला आहे. शरद पवार कोरोना सेंटरच्या उद्घाटनासाठी आलेल्या टोपे यांनी नगर येथे सांगितले, की शरद पवार यांचा कोरोना चाचणी अहवाल नकारात्मक आला आहे. त्यांच्या सहा कर्मचाèयांचा कोरोना चाचणी अहवाल होकारात्मक आला आहे. यामध्ये तीन अंगरक्षकांचा समावेश आहे. पवार अतिशय तंदुरुस्त आहेत. त्यांना कुठेही प्रॉब्लम नाही. मी स्वतः खात्री केली आहे. त्यांच्या अवती-भोवतीच्या ४०० ते ५०० जणांची चाचणी करण्यात येत आहे. ‘चाचणी नकारात्मक आली असली, तरी ते चार दिवस कोणालाही भेटणार नाहीत. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये ही कोरोना टेस्ट करण्यात आली,‘ अशी माहिती राष्ट्रवादी प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर काही काळ शरद पवार यांनी घरीच थांबणे पसंत केले होते; मात्र अनलॉक प्रक्रिया सुरू होताच आणि राज्यातील कोरोनाचे संकट गडद होताच पवार यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पवार यांनी राज्यभरातील विविध शहरांमध्ये जात कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला.
तसेच स्थानिक नेते आणि प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या. या संपूर्ण दौरयात पवार यांच्यासोबत अनेक लोकांचाही वावर होता; मात्र निवासस्थानावरील काही व्यक्त कोरोनाबाधित झाल्यामुळे पवार हे पुढील काही दिवस बैठका टाळतील, अशी शक्यता आहे. सिल्व्हर ओकवरील कोरोनाबाधित कर्मचारयाची संख्या आता १२ इतकी झाली आहे. सिल्व्हर ओकवरील ५० कर्मचारयाची नुकतीच रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. यापैकी काहीजणांचे कोरोना अहवाल अद्याप आलेले नाहीत; मात्र आतापर्यंत १२ जण कोरोनाबाधित आढळल्याने सिल्व्हर ओकवर चिंतेचे वातावरण आहे. या सर्वांमध्ये अद्याप कोरोनाचे कोणतेही लक्षण आढळून आलेले नाही. त्यांची केवळ चाचणीच होकारात्मक आली आहे. या सर्वांची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आली आहे.
पवार कुटुबीयांचे अहवाल नकारात्मक
खासदार सुप्रिया सुळे यांच्या चालकालाही कोरोनाची लागण झाली. या पाश्र्वभूमीवर पवार कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. त्याचे अहवाल नकारात्मक आले. पवार यांनी राज्यभरात फिरून दौरे करू नयेत, अशी विनंती आपण करणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.