मराठी

विश्वजीत कदम यांच्या कुटुंबात तिघांना कोरोना

पुणे :- मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. कदम यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. घरातल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. बंधू, वहिनी आणि पुतण्याची कोरोना चाचणी होकारात्मक आली असून माझी प्रकृती ठणठणीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button