मराठी

मध्य प्रदेशात कोरोना चाचणी मोफत

शिवराज सिंह चौहानयांच्या अध्यक्षतेखाली घेतला निर्ण़य

भोपाळ/दि.८ – मध्य प्रदेशमध्ये(MADHYA PRADESH) कोरोना चाचणीसाठी(CORONA TEST) नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कोरोना संसर्गाची तपासणी मोफत करण्यात येईल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानयांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने हा निर्ण़य घेतला आहे. संपूर्ण राज्यात मोफत कोरोना चाचणी करण्यासाठी ‘फिव्हर क्लीनिक‘ची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय ऑक्सिजन बेडस्ची संख्या ११ हजार ७००पर्यंत करण्यात येणार आहे. दुसरीकडे सरकारने ७०० आयसीयू बेडस् वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना महासाथीवर नियंत्रण आणण्यासाठी रुग्णालयात बेडस् वाढविण्यात येत आहे. याअंतर्गत ग्वाल्हेर आणि जबलपूरमध्ये बेडस्ची संख्या सर्वाधिक वाढविण्यात येईल. सरकारने कोरोना संसर्गासाठी राज्यात जागरुकता अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नगरीय आणि पंचायत विभाग, शहर, आणि गावात प्रचार अभियान सुरू करण्यात येईल.
सध्या राज्यात तीस हजार जनरल बेडस् आहेत. याची संख्या वाढविल्याने रुग्णांवर उपचार करणे सोपे जाईल. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४२ लाख ८० हजार ४२३ झाली आहे. असे असले तरी आज गेल्या काही दिवसांच्या तुलनेत नवीन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. आज एका दिवसात ७५ हजार ८०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सतत ९० हजारहून अधिक रुग्ण सापडत असताना आजची आकडेवारी दिलासा देणारी आहे. आज ११३३ रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण ७२ हजार ७७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. २४ तासात विक्रमी ७४ हजार १२३ रुग्ण निरोगी झाले आहेत. कोरानामुक्तांची संख्या ३३ लाख २३ हजार ९५१ आहे. देशात आठ लाख ८३ हजार ६९७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

Back to top button