मराठी

देशभर कोरोनाची लस मोफत

भाजपला उपरती

बालासोर/दि.२६ – बिहारमध्ये भाजपचे सरकार आले, तर राज्यातील संपूर्ण जनतेसाठी कोरोनाची लस मोफत देण्यात येईल, अशी घोषणा भाजपच्या घोषणापत्रात केली. या घोषणेवर विरोध पक्षाने तीव्र आक्षेप घेतला. निवडणूक असलेल्या राज्याला मोफत लस देण्याचे आश्वासन इतर राज्यांसोबत भेदभाव आहे. त्यावरून वादळ उठल्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत सल दिली जाईल, अशी घोषणा केली. ओडिशाच्या बालासोरमध्ये तीन नोव्हेंबरमध्ये पोटनिवडणूक आहे. त्यासाठी सारंगी बैठकीसाठी तेथे आले. तेथील पोहोचले. बिहारमधील मोफत लसी देण्याच्या आश्वासनानंतर ओडिशाबाबत भाजपची काय भूमिका आहे, अशी विचारणा ओडिशाचे अन्नपुरवठा व ग्राहक कल्याण मंत्री आर.पी. स्वाइन यांनी सारंगी यांना केली. त्या वेळी माध्यमांशी सारंगी म्हणाले, की देशातील सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली आहे. प्रत्येक नागरिकाच्या लसीकरणासाठी सुमारे ५०० रुपये खर्च येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. स्वाइन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सारंगी यांनी देशभरात मोफत लस देण्याची घोषणा केली. स्वाइन यांनी केंद्रातील ओडिशाचे दोन्ही मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सारंगी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. तमीळनाडू, मध्य प्रदेश, आसाम आणि पुद्दुच्चेरी या राज्यांनी आधीच आपल्या लोकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देशासाठी मोफत लसीची मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button