नवी दिल्ली दि.१३ – रशियाने कोरोना विषाणूवरील लसीची नोंदणी आणि बाजारात आणण्याची घोषणा केल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमती कमी होत आहेत. स्पॉट मार्केटबरोबरच फ्युचर्स मार्केटमध्येही या दोन्ही धातूंच्या qकमतींमध्ये मोठी घट दिसून आली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) ऑक्टोबरमध्ये सोन्याची qकमत पाच हजार ३८५ रुपयांनी म्हणजेच ०.७४७४ टक्क्यांनी घसरून ५१ हजार ८६९ रुपये प्रतितोळा झाली. मागील सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ५२,२५४ रुपये होता. गुरुवारी सकाळी सोन्याचे भाव थोडे वधारले होते; परंतु नंतर त्यांनी आपटी खाल्ली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, ४ डिसेंबर २०२० रोजी डिलीव्हरीचे सोने ४०३ रुपयांनी किंवा ०.७७ टक्क्यांनी घसरून ५२ हजार ७० रुपये प्रतितोळा असेल. चांदीच्या दरातही घसरण सुरू आहे. चार सप्टेंबर २०२० रोजी एमसीएक्सवर चांदीचा वायदा भाव ३८ ९ रुपयांनी किंवा ०.८८ टक्क्यांनी घसरून ६६ हजार ३६४ रुपये प्रतिकिलो असेल. त्याचप्रमाणे ४ डिसेंबर २०२० रोजी चांदीची किंमत ३१० रुपयांनी म्हणजे ०.४५ टक्क्यांसह ६८ हजार ७१० रुपये प्रति किलो दाखवण्यात आली आहे. त्याचबरोबर ५ मार्च २०२१ रोजी चांदीचा वायदा दर २५०० रुपयांनी म्हणजेच ७० हजार ७४८ रुपये प्रतिकिलो दर्शविण्यात आला.
ब्लूमबर्गच्या मते आंतरराष्ट्रीय स्तरावरील किंमतींच्या संदर्भात डिसेंबर २०२० मध्ये कॉमेक्सवर सोन्याचे दर ०.७११ टक्क्यांनी घसरून १९३५.२० डॉलर प्रति औंस झाले आहेत. दुसरीकडे, स्पॉट मार्केटमधील सोन्याचे भाव ११.४ डॉलर म्हणजेच ०.६० टक्क्यांनी वधारून ते प्रति औंस १ ९२७.२७ प्रतिऔंस डॉलर दाखविले जात होते. सोन्या-चांदीच्या किंमतींवर कोरोना लसीचा प्रभाव दिसत असून दोन दिवसांत सोन्याची किंमत २५५५ रुपयांनी खाली येईल