मराठी

कोरोना विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत

चीनच्या शास्त्रज्ञांचा दावा

वॉशिंग्टन/दि.१४ –  जगभरात कोरोनाचे संकट गडद होत असताना चीनवर सातत्याने टीका होत आहे. याच दरम्यान चीनच्या एका वैज्ञानिकाने दावा केला आहे, की जगभरात हाहाकार माजवत असलेला हा विषाणू चीनच्या प्रयोगशाळेत तयार झाला आहे आणि त्यांच्याकडे या गोष्टीचे पुरावेही आहेत. कोरोना विषाणूच्या या संकटाला दहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेल्यावर हे विधान समोर येत आहे. या रोगाचा उपाय शोधण्यात वैज्ञानिकांना अद्याप यश आलेले नाही.
कोरोनाचा विषाणू चिनी प्रयोगशाळेतूनच बाहेर पडल्याचा हा खळबळजनक दावा चिनी वैज्ञानिक ली-मेंग यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेतच तयार झाला आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये याच वुहान शहरातून कोरोना विषाणूचा पहिला संसर्ग झाला होता. तेव्हा असे सांगण्यात आले होते, की वुहानमधून हा विषाणू सी-फूड बाजारपेठेतून बाहेर पडला; पण याबाबत कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोग्यतज्ज्ञांनी अशी शंका व्यक्त केली होती, की हा वुहानच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला मानवनिर्मित विषाणू असू शकतो जी प्रयोगशाळा सी-फूड बाजारपेठेच्या नजिकच आहे. याच प्रकारचा खळबळजनक दावा आता चिनी विषाणूतज्ञ ली-मेंग यांनी केला आहे ज्यांचे म्हणणे आहे, की हा विषाणू वुहानच्या त्याच प्रयोगशाळेतून बाहेर पडला आहे ज्याचे नियंत्रण सरकारकडे आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी त्यांच्या या दाव्याचा पुरावाही त्यांच्याकडे असल्याचे प्रतिपादन केले आहे.
ली-मेंग या या वर्षाच्या सुरुवातीला हाँगकाँगला गेल्या होत्या आणि त्यानंतर सुरक्षेच्या कारणासाठी अमेरिकेला गेल्या होत्या. त्यांनी असाही आरोप केला आहे, की चीनने या विषाणूबद्दलची सार्वजनिक कबुली दिली. त्याआधीच त्यांना या गोष्टीची माहिती होती. सुरुवातीला त्यांनी ही गोष्ट लपवण्याचा प्रयत्न केला. ली-मेंग यांची मोजणी जगातील अशा वैज्ञानिकांमध्ये केली जाते ज्यांच्यावर गेल्या वर्षाच्या शेवटी चीनच्या वुहानमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या अभ्यासाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Related Articles

Back to top button