वाशिंग्टन/दि. २३– कोरोना(Covid-19) विषाणूमुळे महामारीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या असून, लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोरोनामुळे लोकांना अत्यंत गरीबीचे जीवन जगावे लागू शकते, असे असे जागतिक बँकेने म्हटले आहे. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालापास म्हणाले, की कोरोना विषाणूमुळे जगभरातील दहा १० कोटींपेक्षा अधिक लोकांना गरीबीत जगण्यासाठी भाग पडू शकते. कोरोनाचा संसर्ग आणखी वाढल्यास आणि हा विषाणू दीर्घकाळ राहिल्यास हा आकडा अधिक वाढेल, असा इशारा जागतिक बँकेने दिला आहे.
याआधी डेव्हिड मालपास यांनी एका अहवालाचा संदर्भ देत सांगितले होते, की सध्याच्या अंदाजानुसार २०२० मध्ये सहा कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली जातील. हा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. मालपास म्हणाले, की श्रीमंत देशांनी गरीब देशांच्या मदतीसाठी पुढे यावे. असे केल्यानेच एवढ्या मोठ्या लोकसंख्येला प्रभावित होण्यापासून वाचवता येईल; मात्र असे करताना श्रीमंत देश गरीब देशांचे शोषणदेखील करू शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. दरम्यान, जागतिक बँकेने जगाभरातील शंभर गरीब देशांसाठी जून २०२१ पर्यंत १२ लाख कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केलेली आहे.