मराठी

कोरोना पॉझिटिव्हची संख्या कमी करणार

नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण बी. म्हणाले

नागपूर/दि.२८– नागपुरात कोरोना पॉझिटिव्हची (Corona positive) संख्या वाढण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृत्यूचा आकडा शून्यावर आणणे कठीण आहे, परंतु नागपूर महापालिका यासाठी पूर्ण प्रयत्न क रेल. संक्रमितांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळावा, यासाठी खासगी व सरकारी रुग्णालयासोबत उत्तम समन्वय बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. एकूणच मनपाची पहिली प्राथमिकता कोरोनावर नियंत्रण मिळविणे आहे, असे मनपाचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी. म्हणाले यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी राधाकृष्णन बी. यांनी मनपा आयुक्तांचा पदभार सांभाळला. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) पॉझिटिव्ह आल्याने ते उपस्थित नव्हते. पदभार स्वीकारताना अप्पर आयुक्त जलज शर्मा, राम जोशी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. चार्ज घेतल्यानंतर ते तात्काळ ऐक्शन मोडवर आले.
अधिकारी व विभाग प्रमुखांसोबत बैठक घेऊन कोरोनाची वर्तमान स्थिती व उपाययोजना संदर्भातील माहिती घेतली. मुंबईतील बीएमसीच्या काही रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचा अनुभव असल्याचे सांगत ते म्हणाले की, रुग्ण संक्रमित आढळल्यानंतर त्याला तात्काळ उपचार मिळणे गरजेचे आहे. गोल्डन अवरमध्ये उपचार मिळत नसल्याने मृत्यूची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांना कोरोनाची लक्षण दिसत असेल त्यांनी तात्काळ टेस्ट करावी. पॉझिटिव्ह आल्यानंतर मधुमेह, बीपी, हायपरटेन्शन व अन्य आजाराने ग्रस्त व्यक्तींना होम आयसोलेशन न करता रुग्णालयात भरती होणे गरजेचे आहे. शिवाय ऑक्सिजनची लेव्हल उत्तम ठेवावी लागेल.

  • टेस्टींगकडे दुर्लक्ष नको

आयुक्त राधाकृष्णन यांना जेव्हा पत्रकारांनी कोरोना टेस्टींग सेंटरवर होत असलेल्या मनमानीबाबत अवगत केल्यावर ते म्हणाले की आता दुर्लक्ष खपवून घेणार नाही. जो वेळ दिला आहे, त्या दरम्यान टेस्ट करावी लागणार आहे. ज्या सेंटरची जेवढी क्षमता आहे, त्याची माहिती घ्यावी लागेल. होम क्वारंटाईन असलेल्या ज्येष्ठ नागरिकांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जर कुठल्या व्यक्तीमध्ये लक्षण दिसून आल्यास त्यांची एंटीजन टेस्ट (Antigen Test) निगेटीव्ह आली असेल तर आरटीपीसीआर टेस्ट करणे आवश्यक असेल अशी व्यवस्था करणार. यावेळी नवीन आयुक्तांना आरोग्य अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे, टेस्टींग सेंटरवर 11 ते 12 वाजेपर्यंत कर्मचारीच येत नसल्याचे, रिपोर्ट चार चार दिवस मिळत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

  • जनतेसोबत लोकप्रतिनिधींचेही ऐकून घेतले जाईल

आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी स्पष्ट केले की, नागपूर मनपा लोकाभिमुख बनवायची आहे. त्यासाठी जनतेसोबतच लोकप्रतिनिधींचेही ऐकून घेतले जाईल. त्यांना विश्वासात घेऊन कामे केली जातील. लोकतांत्रिक व्यवस्थेचा आदर होईल. कायद्यानुसार जे योग्य असेल ती कामे केली जातील. प्रशासन व पदाधिकाख्रयांमध्ये उत्तम समन्वय ठेवून काम करण्यात येईल. कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये हे दोन गाडीचे मुख्य चाक आहेत. लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून पाठविले आहे. त्यामुळे ते जनतेचीच कामे घेऊन येतील. त्यामुळे त्यांचेही ऐकणे गरजेचे आहे. प्रशासन व सत्तापक्षात संतुलन ठेवून कामे केली जातील.
नवनियुक्त आयुक्तांनी सांगितले की, कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्राची आर्थिक स्थिती वाईट आहे. नागपूर महापालिकेलाही फटका बसला आहे. मनपाच्या वित्तीय स्थितीची समीक्षा करण्यात येईल. त्यानुसार खर्चाची प्राथमिकता ठरविण्यात येईल. विकास कामांना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल.
नवीन आयुक्त म्हणाले की सिटी बस संचालनाची आवश्यकता व वर्तमान सार्वजनिक परिवहन व्यवस्था याची समीक्षा करण्यात येईल. व्यापाऱ्यांसाठी ऑड-इव्हन व्यवस्था रद्द करण्याच्या मागणीची समीक्षा केली जाईल. सध्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी बस बंद आहे व ऑड-इव्हन व्यवस्था सुरू आहे.

Related Articles

Back to top button