मराठी

कोरोनाचा फटका सरकारच्या कर संकलनात २२. ५ टक्के घट

मुंबई/दि. १६ – कोरोनाचा सरकारला चांगलाच फटका बसला आहे. पहिल्या सहामाहीत थेट कर संकलनात 22.5 टक्क्यांनी घट झाली. बंगळूर वगळता दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नईमध्ये कर संकलनात मोठी घट झाली आहे.
आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत थेट कर संकलनात 22.5 टक्के घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ च्या पहिल्या सहामाहीत थेट कर संकलन २२..5 टक्क्यांनी घसरून दोन लाख 53 हजार ५३२ कोटींपर्यंत घसरले. आर्थिक वर्ष 2021 मध्ये 15 सप्टेंबरपर्यंतचे कर वसुलीचे हे आकडे आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील कर वसुली आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत 13.9 टक्क्यांनी घटले आहे. आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत कोलकातामधील कर संकलन 13.9 टक्क्यांनी कमी झाले. त्याच काळात, चेन्नईत सर्वाधिक म्हणजे 37.3 टक्क्यांनी कर संकलनात घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत दिल्लीतील कर संकलन 33 टक्क्यांनी घसरले.  कोरोना काळात फक्त बंगळूर हेच अपवाद ठरले. तिथे माहिती तंत्रज्ञान कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. कोरोनाचा कोणताही परिणाम त्यांच्यावर झाला नाही. त्यामुळे बंगळूरमध्ये कर संकलन घटले नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या सहामाहीत बंगळूरमध्ये कर संकलन वाढले आहे. पहिल्या सहामाहीत बंगळूरच्या कर संकलनात 9.9 टक्के वाढ दिसून आली. आयटी हब असण्याचा फायदा बंगळूरला झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना कालावधीत, आयटी आणि इंटरनेटवरील वाढत्या अवलंबनाचा फायदा बंगळूरला झाला आहे.

Related Articles

Back to top button