मराठी

अर्थव्यवस्था सुधारली, तरच कोरोनाचा पराभव

जागतिक आरोग्य संघटनेचे मत

मुंबई/दि.१७  – कोरोनाला पराभूत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अर्थव्यवस्था पुन्हा उघडणे, हा एकमेव मार्ग आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर अर्थव्यवस्था आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे. जीएसटी संकलन, पेट्रोलियम पदार्थांचा वापर, वीज वापर आणि इतर निर्देशांक पाहिले, तर अर्थव्यवस्था सुधारण्याच्या मार्गावर आहे, हे स्पष्ट दिसते.
कोरोना लसीच्या उत्पादनाबाबत वेगवेगळ्या संस्थांनी दावे केले आहेत. तसे झाले, तर येत्या काही दिवसांत अर्थव्यवस्था आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे. कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढण्यासाठी चांगले जीवन आणि उदरनिर्वाहाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. कोरोनाचा पराभव करण्याचा सर्वांत वेगवान मार्ग जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक (महानिदेशक) टेड्रोस ॲलोम घेबेरियस यांनी सांगितला. अर्थव्यवस्था परत रुळावर येण्याचा सर्वांत वेगवान मार्ग म्हणजे विषाणूचा पराभव करणे होय. यासाठी अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याची आवश्यकता आहे. ते म्हणाले, की जी -20 देशांचे नेते या आठवड्याच्या शेवटी भेट घेतील. कोरोना विषयी जागतिक सुविधा पुरवण्यासाठी आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या वचनबद्ध बनण्याची संधी देईल. कोरोना लस गरीब देशांपर्यंत पोचविण्यासाठी व्यवस्थआ केली जाईल.
बहुतेक देशांनी अर्थव्यवस्था सुरळीत सुरू करण्याची मोहीम उघडली आहे. विशेषत: भारत, चीन, जपान आणि अमेरिकेसारख्या देशांनी आपली अर्थव्यवस्था पुन्हा सुरू केली आहे. ज्या देशांमध्ये सर्वाधिक कोरोना प्रकरणे आढळली आहेत, त्यांनी टाळेबंदी पूर्णतः उठविली आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास आणि इतर काही क्षेत्रे बंद आहेत. मे महिन्यापासून भारतात अनलाॅकची प्रक्रिया सुरू झाली. 25 मेपासून देशांतर्गत हवाई सुरू करण्यात आली. त्यानंतर अनलॉकच्या कित्येक टप्प्यात वेगवेगळे सेक्टर उघडले गेले. नुकतीच हॉटेल, जिम आणि तीर्थक्षेत्रे उघडली आहेत. अर्थव्यवस्था उघडण्याचा एकमात्र परिणाम म्हणजे जीएसटी संकलन, पेट्रोलियम पदार्थांचा वापर, वीज वापर आणि इतर निर्देशक या वेळी कोरोनाच्या पूर्वीच्या पातळीवर पोहोचले आहेत. रेल्वे आणि विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या आधीच्या पातळीवर पोहोचली आहे. जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. लोकांच्या हालचालींमुळे आणि इतर क्षेत्रे उघडल्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होत आहे.

Related Articles

Back to top button