कोरोनाचा महिलांच्या उद्योगावर तीव्र परिणाम
मुंबई/दि ३० – भारतातील कोरोना कालावधीत महिलांद्वारे चालवल्या जाणा-या लघुउद्योगांवर तीव्र परिणाम झाला आहे. सामाजिक आणि आर्थिक फरक वेगाने वाढला आहे. बँका आणि अन्य वित्तीय संस्थांनी महिलांसाठी लिंग-संवेदनशील धोरण राबवावे, जेणेकरुन त्यांना या परिस्थितीवर मात करता येईल, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे.
ग्लोबल अलायन्स फॉर मास एंटरप्रेन्योरशिप आणि क्रेया युनिव्हर्सिटी (लीफ नफा रिसर्च ऑर्गनायझेशन) च्या प्रमुख संस्थेच्या सहकार्याने हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण मे 2020 मध्ये सुरू झाले आणि ते जानेवारी 2021 पर्यंत सुरू राहिल. जुलै ते ऑगस्ट दरम्यान संस्थेने 1,800 उद्योगांमधील डेटाचा अभ्यास केला. या सर्वेक्षणात दिल्ली, हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानचा समावेश होता.
या सर्वेक्षणानुसार कोरोना काळातील महिलांनी चालवलेल्या छोट्या उद्योग आणि छोट्या कंपन्यांना अधिक त्रास सहन करावा लागला आहे. पुरुषांनी बनवलेल्या उत्पादनांच्या ऐवजी महिलांनी बनवलेल्या वस्तू बाजारात विकल्या जातात. महिलांनी चालवलेल्या उद्योगातील 43 टक्के महिलांना दरमहा दहा हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न मिळाले. पुरुषांद्वारे चालवल्या जाणा-या 16 टक्के उपक्रमांचा या वर्गात समावेश आहे. यापैकी 40 टक्के द्योग महिला कोणाचीही मदत न घेता चालवतात, तर 18 पुरुष असे उद्योग चालवतात. टाळेबंदी दरम्यान, 80 टक्के महिलांना लघुउद्योगांसाठी बँक कर्ज मिळालेले नाही. त्याच वेळी, दोन-तृतियांश महिलांनी या बचतींचा वापर उद्योग चालू ठेवण्यासाठी केला.