उत्पन्न वाढीसाठी महामंडळाचा निर्णय
कोरोनामुळे अत्यल्प एसटी बस रस्त्यावर एसटी करणार खासगी वाहनांचे टायर रिमोल्ट
अमरावती प्रतिनिधी/ ९ ऑगस्ट – कोरोनामुळे एसटी बसेस ठप्प झाल्यात. कोरोना कमी झाला नाही मात्र आता बसेस सुरू झाल्यात. असे असले तरीही प्रवाशोचा अत्यल्प प्रतिसाद आहेत. मागील चार महिन्यापासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे एसटी महामंडळाला प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. दरम्यान,एसटी महामंडळाची स्त:ची टायर रिमोल्ट करणारी यंत्रणा आहे. मात्र एसटीच उभी असल्यामुळे टायर रिमोल्ट करणारी यंत्रणासुध्दा ठप्प आहे. त्यामुळेच आता एसटीने खासगी वाहनांचे टायर रिमोल्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पन्न वाढीसाठी यापुर्वीच मालवाहू केल्या आहेत. यामधुन महामंडळाने प्रवासी बसला महामंडळाला काही प्रमाणात उत्पन्न प्रतिसाद नसल्यामुळे काही बसेस सुरू झाले आहे. मात्र फटका प्रचंड मोठा असून त्यामध्ये अधिकाधिक उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान अमरावतीसह राज्यात ज्याठिकाणी एसटीकडे टायर रिमोल्ड करणारी यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्या ठिकाणी खासगी वाहनांचे टायर रिमोल्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. टायरच्या आकारमानानुसार रिमोल्डसाठी एसटी टायर मालकाकडून २ हजार ५०० ते ४ हजार ५०० रूपयांपर्यंत रक्कम आकारणार आहे. ही यंत्रणा यंत्र अभियंता, उपयंत्र अभियंता यांच्या देखरेखीला हे काम करणार आहे. यावेळी खासगी वाहनांसोबतच शासकीय तसेच निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचेही टायर रिमोल्ड करून देण्यात येणार असल्याचे स्थानिक एसटीच्या सुत्रांनी सांगितले. बा्नस दरमहा १८०० टायर रिमोल्ड व्हायचे कोरोनापुर्व काळात जिल्हाभरातील एसटी बसेसचे सुमारे १८०० टायर याठिकाणी रिमोल्ड होत होते. मात्र मागिल चार महिन्यापासून बसेसच रस्त्यावर नाही त्यामुळे टाय रिमोल्डसुध्दा बंर आहे. दरम्यान, आता खासगी वाहनांचे टायरसुध्दा रिमोल्ड करण्याचा निर्णय घेतला आहे. –श्रीकांत गभणे विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, अमरावती