मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात 20 बेडचे कोविड रुग्णालय सुरू
आमदार देवेंद्र भुयार यांनी केली मोर्शी येथील कोविड रुग्णालयाची पाहणी
मोर्शी दि १५ – मोर्शी येथे उभारण्यातआलेल्या कोविड 19 रुग्णालयाची आमदार देवेंद्र भुयार यांनी पाहणी केली. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आरोग्य सेवेसाठी रुग्णालयाची आवश्यकता लक्षात घेऊन; खबरदारीचा उपाय म्हणून मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात 20 बेडचे कोविड 19 रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरया कोविड रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सर्व सोयी सुविधांची माहितीही व समस्या आमदार देवेंद्र भुयार यांनी जाणून घेतल्या.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विशेष प्रयत्नामुळे मोर्शी येथे 20 बेडचे कोविड रुग्णालय वरुड मोर्शी कारांच्या सेवेत सुरू झाले असून या रुग्णालयात 20 बेड असून त्यापैकी 14 ऑक्सिजन बेड व 6 जनरल बेड आहेत. भेट दिली असता रुग्णालयात 30 ते 50 च्या वयोगटातील 12 रुग्ण उपचार घेत आहेत. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी येथील कोविड रुग्णालयात भरती असलेल्या 12 रुग्णांची भेट घेऊन कोविड रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयात हॉस्पिटलमधील उपचार सुविधा, स्वच्छता, रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा त्यांच्या दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले. त्याच बरोबर कोरोना चे उच्चाटन करण्यासाठी आपल्याला पूर्ण क्षमतेने कोरोना विरुद्ध लढायचे आहे असे सांगत डॉक्टर ,आरोग्य कर्मचारी व इतर सर्व फ्रन्टलाइन कर्मचारी यांनी पूर्ण ताकदीने उभे राहायचे आहे.यात काही अडथळे आल्यास ते सोडविण्यासाठी प्रशासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे सांगितले. कोरोनाशी सामना करताना फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांनी आपले सुरक्षा कवच म्हणून लसीकरण करून घेण्याचेही सांगितले.यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी कोविड हॉस्पिटल मधील रुग्णांशी संवाद साधत त्यांना मिळणाऱ्या उपचार सुविधा याबाबत चौकशी केली .
तसेच लॉकडॉन लागू असताना काही नागरिक रस्त्यावर विनामास्क फिरू नये. यापुढे मास्क वापरणे , सोशल डिस्टन्स पाळणे, हात धुणे या त्रीसुत्रीचा वापर करणे व इतरांना सांगणे याबाबत सूचित केले. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, वैद्यकीय अधिकारी डॉ वानखडे, मोहन मडघे,यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.