मराठी

महिलेच्या छेडखानी प्रकरणी इसमाविरुद्ध गुन्हा

पवनी (स.) शेतशिवारातील घटना

वरुड/दि.२४ – येथुन जवळच असलेल्या पवनी (स.) शेतशिवारातील शेतात कापुस वेचायला गेलेल्या ४८ वर्षीय महिलेची छेडखानी केल्याप्रकरणी ६० वर्षीय इसमाविरुद्ध वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पवनी (स.) येथील ४८ वर्षीय महिला ही स्वत:च्या शेतामध्ये कापुस वेचण्याकरिता गेली असता दुपारी २ वाजुन ३० मिनिटाच्या सुमारास आरोपी विठ्ठल वाटाणे हा फिर्यादी जवळ आला. त्यानंतर सदर महिलेने त्यास माझे पती शेतात आले नाही. त्यामुळे तु माझे शेतातुन निघुन जा, असे म्हणुन ती कापुस वेचायला लागली असता आरोपी विठ्ठल हा सदर महिलेच्या मागुन आला व जबरदस्तीने कापुस वेचुन महिलेच्या खंदाळीत टाकु लागला. फिर्यादीने त्यास कापुस खंदाळीत टाकु नको म्हटले असता आरोपी विठ्ठलने महिलेस त्याचेकडे ओढले व महिलेने प्रतिकार केला असता यातील आरोपी विठ्ठलने महिलेच्या तोंडावर दोन भुक्या मारुन ओढतान करुन छेडखानी केली.
याप्रकरणी सदर महिलेच्या तक्रारीवरुन वरुड पोलिसांनी भांदवि ३५४, ३२३, भांदवि ३ (१), (डब्ल्यु), (आय), ३ (१), (डब्ल्यु), (आय.आय.) अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार मगन मेहते यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Back to top button