मराठी

मारहाण प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हे : १ जखमी

तालुक्यातील वडाळा येथील घटना

वरुड दी ३ – जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत १ गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन बेनोडा शहिद पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा येथे फिर्यादी नितीन याचे काका कृष्णराव हे परिवारासह राहतात. आजोबाची शेतजमिन कृष्णराव गेल्या अनेक वर्षांपासुन वाहत असुन नितीनच्या वडीलांचा सदर शेतात हिस्सा असुन सुद्धा ते अडीच एकर शेतातील १ एकर शेत सुद्धा नावाने करत नाही म्हणुन काका पुतण्याचे एकमेकांशी पटत नाही. यापुर्वी सुद्धा या दोघांच्या एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रारी झाल्या आहेत. घटनेच्या दिवशी नितीन आणि त्याची आई मनकर्णा घराबाहेर कामाला गेले होते व वडील नातेवाईकांकडे गेले होते. नितीनचा मोठा भाऊ किशोर (३३) हा घरच्या शेतात वहीवाटीला गेला होता. सायंकाळी ६ वाजता तो घरी परत आला. त्याने काका देवानंद यांचे घरासमोर जावुन नितीनचा चुलत भाऊ देवानंद याला तुमच्या कोंबड्या माझे घराच्या छतावर येतात. त्यामुळे आमची झोप मोड होते, तुम्ही कोंबड्या कु:हाड्यात ठेवत जा, मोकळे कशाला सोडता? असे म्हटले असता किशोर याला शिवीगाळ केली व काका कृष्णराव यांनी त्याची कॉलर पकडुन त्याला खाली पाडले. व चुलत भाऊ देवानंद याने मारहाण करुन किशोर यास गंभीर जखमी केले.
याप्रकरणी नितीन बाबाराव खनखने (२९) रा.वडाळा यांचे फिर्यादीवरुन बेनोडा शहिद पोलिसांनी देवानंद कृष्णराव खनखने, कृष्णराव विठोबा खनखने, पुष्पा कृष्णराव खनखने, शिल्पा देवानंद खनखने यांचे विरुद्ध भांदवि ३२४, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास ठाणेदार सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Related Articles

Back to top button