मराठी

अश्लिल चाळे करणा-या युवकाविरुध्द गुन्हा

तालुक्यातील पुसला येथील घटना

वरुड/ दि.२२ – युवतीसमोर अश्लिल चाळे करणा:या पुसला येथील ३० वर्षीय युवकाविरुध्द शेंदुरजनाघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, पुसला चेतन विठ्ठलराव नानोटकर (३०) याने गावातीलच रहिवाशी असलेल्या ३४ वर्षीय युवतीसमोर येवुन तिला अश्लिल शिविगाळ करुन स्वत:च्या अंगातील कपडे काढून लिंग दाखवुन अश्लिल हातवारे करुन व बलात्कार करुन जीवानीशी ठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी सदर युवतीच्या तक्रारीवरुन शेंदुरजनाघाट पोलिसांनी चेतन विठ्ठलराव नानोटकर (३०) रा.पुसला याचे विरुध्द भादंवि ३५४, ३५४ (ड), ५०९, २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विजय लेवरकर करीत आहेत.

Back to top button