मराठी

नियंत्रण रेषा ओलांडली, तर चोख उत्तर भारताचा चीनला इशारा

भारताने स्थिती केली मजबूत

नवीदिल्ली/दि. १० – नियंत्रण रेषेजवळील चीनच्या दादागिरीवर भारतीय सैन्याने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने लक्ष्मण रेषा ओलांडली तर, चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा भारताने दिला आहे. उंचावरील या युद्धक्षेत्रामध्ये भारतावर दबाव टाकण्यासाठी चीनकडून आक्रमक पद्धतीने सैन्य तैनात केले जाते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही फॉरवर्ड पोझिशन्सवरील आपली स्थिती आणखी बळकट केली आहे. चुशूल सेक्टरमध्ये मुखपरी टॉपजवळ सोमवारी ४५ वर्षात पहिल्यांदाच गोळीबार झाला. त्यानंतर भारताकडून हा इशारा देण्यात आला. पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनार्याजवळ २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनने एकतर्फि नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. जो प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला व भारताच्या स्पेशल फटियर फोर्सने रणनीतीक दृष्टीने महत्त्वाच्या दक्षिण किनार्याजवळच्या टेकडया ताब्यात घेतल्या. तेव्हापासून चीनची दादागिरी आणि आक्रमकता वाढली आहे. भारतानेही आतापर्यंत चीनचा घुसखोरीचा एकही डाव यशस्वी होऊ दिलेला नाही. चीनला युद्ध हवे असेल, तर त्यांनासुद्धा त्याची जबर किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भारताने दिला. जशास तसे उत्तर म्हणून चीन याच क्षेत्रातील दुसरे अन्य उंचावरील भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु शकतो; पण भारतानेसुद्धा ग्राऊंड लेव्हलवर तैनात असलेल्या आपल्या कमांडर्सना परिस्थितीनुसार प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे.
आपले सैन्य उंचावरील क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह पूर्णपणे सज्ज आहे. रेचिन ला च्या रिजलाइनजवळ आपणही रणगाडे आणून ठेवले आहेत, असे या अधिकाèयाने सांगितले. लडाख पूर्व भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत-चीन दरम्यान तणाव वाढत चालला आहे. भारतीय सैन्याने पॅन्गाँग त्सो सरोवराजवळ दाखवलेल्या आक्रमकतेमुळे चीन गडबडला आहे. आता चीनने भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी नव्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. रात्रीच्या वेळी युद्ध सरावही केला. चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाइम्स‘ने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी‘ने (PLA) रात्रीच्या वेळी युद्ध सराव केला आहे. या दरम्यान चिनी सैन्याने अनेक रॉकेटस् डागले असून विविध प्रकारच्या बॉम्बची चाचणी केली. चीन आणि भारतादरम्यान मे महिन्यापासून सुरू झालेला तणाव निवळण्याऐवजी तो अधिकच गंभीर होत असल्याचे दिसत आहे. गलवान खोèयातील हिंसक संघर्षानंतर पॅन्गाँग सरोवराजवळही दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संघर्ष झाला. भारतीय जवानांनी दाखवलेल्या आक्रमकेतमुळे चीनचा घुसखोरीचा डाव उधळला गेला. त्यानंतर चीनने या भागात सैन्याची कुमक वाढवली असून शस्त्र सज्ज ठेवली आहेत. ‘ग्लोबल टाइम्स‘(GLOBAL TIMES) ने संरक्षण विश्लेषकांच्या हवाल्याने सांगितले, की चिनी सैन्याने कुमक वाढवली असून घातक शस्त्रेही तैनात केली आहेत. एअर डिफेन्स, सशस्त्र वाहने, पॅराट्रूपर, स्पेशल फोर्स देशातील विविध भागातून बोलावण्यात आली आहेत. ‘पीपल्स लिबरेशन आर्मी‘च्या सेंट्रल थिएटर कमांड एअर फोर्सच्या एच-६ बॉम्बर आणि वाय-२० ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट ट्रेनिंग मिशनसाठी या ठिकाणी तैनात केले आहेत.

 लाईव्ह यर ड्रिल

‘पीपल्स लिबरेशन आर्मी‘च्या तिबेट मिलिट्री कमांडने ४५०० मीटर उंचावर संयुक्त ब्रिगेड स्ट्राइक सराव केला. पीएलएच्या ७२ व्या ग्रुप सैन्यदेखील दाखल झाले आहे. एअर डिफेन्स ब्रिगेडनेही लाइव्ह फायर ड्रिल केली. यामध्ये अ‍ॅण्टी एअरक्राफ्ट गन आणि क्षेपणास्त्रांचा सराव करण्यात आला. मागील काही दिवसांपासून चीन सातत्याने आपण युद्धासाठी सज्ज असल्याचे दाखवत आहे. .

लडाखमध्ये एक लाख सैन्य

भारतासोबत पुन्हा संघर्ष उद्भवू शकतो अशा ठिकाणी चीन अधिक सैन्य आणि रणगाडे तैनात करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चीनचे जवळपास एक लाख सैन्य लडाख पूर्व भागात तैनात आहे. चर्चेतून तणाव कमी होईल, अशी आग्रही भूमिका चीन मांडत असला, तरी जमिनीवर परिस्थिती वेगळी आहे. चीन या भागात आपले सैन्य अधिकच बळकट करत आहे.

Related Articles

Back to top button