मराठी

कच्च्या तेलाचे दर ४० डॉलरच्या आत

८ टक्क्याने कमी होऊन ३६.३५ डॉलर

नवीदिल्ली/दि. ९ – कच्च्या तेलाच्या(crude oil) किंमतींमध्ये मोठी घसरण दिसून आली. जगातील कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि सौदी अरेबियाने किंमतीत जाहीर केलेली कपात यामुळे ही घट झाली. जूननंतर प्रथमच कच्च्या तेलाचे दर ४० डॉलर प्रतिपंपाच्या खाली आले आहेत. या कालावधीत, मंगळवारी डब्ल्यूटीआय क्रूड(WTI CRUDE) ८ टक्क्याने कमी होऊन ३६.३५ डॉलर प्रतिपंपापर्यंत घसरले. १५ जूनपासूनचा आतापर्यंतचा सर्वात कमी दर सध्या आहे. याव्यतिरिक्त, ब्रेंट क्रूड देखील जवळजवळ सहा टक्क्यांनी घसरले. कच्च्या तेलाचा या विभागातला भाव ३९.५५ डॉलर प्रतिqपपावर आला. डब्ल्यूटीआय क्रूड आणि ब्रेंट क्रूडचे दर ऑगस्टच्या तुलनेत खाली आले आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग भारत, ब्रिटन, स्पेन आणि अमेरिकेत वेगाने पसरत आहे. त्यामुळे इंधनाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी ‘अरामको‘ ने ऑक्टोबरमध्ये वायदे किंमतीत कपात जाहीर केली. त्यानंतर क्रूडच्या किंमतीत घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या मागणीत अपेक्षित घट झाल्यामुळे किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबियाने क्रूडच्या किंमतीत कपात केल्याच्या घोषणेनंतर आशियाई खरेदीदारांसाठी डब्ल्यूटीआय क्रूडमधील रस कमी होईल, याचा बाजारावरही परिणाम होईल. पेट्रोलियम निर्यात करणा-या देशांची आणि संलग्न संघटनांच्या संघटना ‘ओपेक‘ ने विक्रमी पुरवठा केल्यामुळे ही घसरण झाल्याचे तज्ज्ञ सांगतात. याव्यतिरिक्त, डॉलर मध्ये झालेली घसरण ही कच्च्या तेलाच्या qकमती कमी होण्याचे कारण झाले. बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींचा आढावा घेण्यासाठी तेल उत्पादक देशांची १७ सप्टेंबरला बैठक होणार आहे.

Back to top button