वरुड २ सप्टेंबर – येथुन जवळच असलेल्या शेंदुरजनाघाट येथील रहिवाशी ७९ वर्षीय वृद्ध आजारी असल्यामुळे त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार करुन सुध्दा आराम पडत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांनी ग्रामिण रुग्णालयात जावुन कोरोना चाचणी करुन घेण्याचे सांेिगतले. ग्रामिण रुग्णालयात कोरोना चाचणी दरम्यान या वृध्द इसमाला कोरोनाचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले आणि काही वेळताच त्यांचा मृत्यू झाला.
कोरोनाग्रस्त इसमाचा मृत्यू झाल्याने शासनाकडून सर्व त्या उपाययोजना व खबरदारी घेवुन त्यांचे नातेवाईकांसोबत चर्चा करुन त्या कोरोनाग्रस्त रुग्णाचे अंत्यसंस्कार वरुडमध्येच करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी नातेवाईकांसोबत चर्चा करण्याकरीता तहसिलदार, शेंदुरजनाघाटचे मुख्याधिकारी गजानन भोयर, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रमोद पोतदार यांचेसह अन्य अधिकारी ग्रामिण रुग्णालयात उपस्थित होते.
शेंंदुरजनाघाट येथील आर.के.चौक परिसरातील रहिवाशी असलेले या वृध्द इसमाचा कोरोनोने मृत्यू झाल्याने सायंकाळी त्यांच्यावर वरुडच्या स्मशासभुमिमध्ये शासकीय नियमांचे पालन करीत व सुरक्षा किट वापरुन शोकाकुल वातावरणात अंत्यविधी पार पडला. यावेळी ठाणेदार श्रीराम गेडाम, कर्मचारी, मुख्याधिकारी गजानन भोयर, आरोग्य कर्मचारी व मोजकेच नातेवाईक अंत्यविधीला उपस्थित होते.